Lokrakshanay
Wednesday, July 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबईत २३ व २६ जुलैला ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’

एकाच ठिकाणी मिळणार विविध शासकीय योजनांचा लाभ

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 22, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
मुंबईत २३ व २६ जुलैला ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ आयोजित करण्यात आले असून, २३ जुलै आणि २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत हे शिबिर भरविण्यात येणार आहे. २३ जुलै रोजी १८०-वडाळा विधानसभा मतदारसंघासाठी निको हॉल, प्लॉट क्र. ४३२, नायगाव क्रॉस रोड, उद्योग भवन, वडाळा (पश्चिम), मुंबई – ४०००३१ येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर २६ जुलै रोजी १७८-धारावी विधानसभा मतदारसंघासाठी भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, बस डेपोजवळ, धारावी, मुंबई – ४०००१७ येथे शिबिर होणार आहे. या विशेष शिबिरामध्ये महसूल विभागासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक योजना आणि सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सेवा हमी कायद्यांतर्गत विविध दाखले, नवमतदार नोंदणी, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, शिधापत्रिकेशी संबंधित सेवा, मत्स्य विभागाच्या सुविधा तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आदी महत्त्वाच्या सेवांचा लाभ नागरिकांना या शिबिरात मिळणार आहे.

महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने विविध निर्णय घेतले असून, त्याचा लाभ तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावा यासाठी राज्यभर ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कोणत्याही एका दिवशी हे विशेष शिबिर आयोजित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. विविध विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहून आवश्यक सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार असून शासकीय सेवांचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार आहे. मुंबई शहर जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन उपलब्ध योजनांचा आणि सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

 

Previous Post

१५ ऑगस्टपासून पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा विलगीकरण सक्तीचे!

Next Post

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा भाडेवाढीची शक्यता; २३ जुलैच्या बैठकीत होणार महत्त्वाचा निर्णय

Next Post
पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा भाडेवाढीची शक्यता; २३ जुलैच्या बैठकीत होणार महत्त्वाचा निर्णय

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा भाडेवाढीची शक्यता; २३ जुलैच्या बैठकीत होणार महत्त्वाचा निर्णय

BreakingNews

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा भाडेवाढीची शक्यता; २३ जुलैच्या बैठकीत होणार महत्त्वाचा निर्णय

मुंबईत २३ व २६ जुलैला ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’

१५ ऑगस्टपासून पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा विलगीकरण सक्तीचे!

अमेरिकेत शिक्षणाचे स्वप्न कठीण; परदेशी विद्यार्थ्यांसाठी व्हिसाला ‘४ वर्षांची’ कमाल मर्यादा!

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुर्मिळ आठवणींना उजाळा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन

ठाणे जिल्ह्यात १५२ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रांना’ हिरवा कंदील!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.