Lokrakshanay
Thursday, June 25, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

पुण्यात पनीरऐवजी ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर; अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई, परवाने जप्त!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 25, 2026
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
पुण्यात पनीरऐवजी ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर; अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई, परवाने जप्त!
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : ग्राहकांची दिशाभूल करून पनीरऐवजी ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील एका हॉटेल आणि डेअरीवर कठोर कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत गंभीर अनियमितता आढळून आल्याने दोन्ही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय सातारा जिल्ह्यात खुल्या स्वरूपात खाद्यतेल विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करत ४ लाख ६८ हजार ४७४ रुपयांचा साठाही जप्त करण्यात आला आहे.

प्राप्त तक्रारीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे कार्यालयाने २२ जून रोजी कॅम्प परिसरातील ‘पिंड पंजाब’ या आस्थापनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान पनीरऐवजी ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर होत असल्याचे उघड झाले. तसेच स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघनही आढळून आले. यानंतर विश्लेषणासाठी नमुने घेण्यात आले असून सुमारे १२ किलो वजनाचा ३ हजार ४८० रुपयांचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. पुढील तपासात संबंधित पदार्थाचा पुरवठा रविवारी पेठेतील ‘बंसल डेअरी’कडून होत असल्याचे समोर आले. त्यानंतर डेअरीची तपासणी करण्यात आली असता तेथे ‘चीज अ‍ॅनालॉग’, पनीर आणि खवा हे पदार्थ सैल स्वरूपात विक्रीस ठेवलेले आढळले. या उत्पादनांवर आवश्यक माहितीपत्रक नसल्याचे तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सुमारे २२५ किलो वजनाचा ६७ हजार ९३० रुपयांचा खाद्यसाठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने यापूर्वीही हॉटेल, रेस्टॉरंट, डेअरी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना ‘चीज अ‍ॅनालॉग’च्या वापराबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. ग्राहकांना पनीर दिले जात असल्याचा आभास निर्माण करून प्रत्यक्षात वेगळ्या प्रकारचा पदार्थ वापरणे ही ग्राहकांची फसवणूक मानली जाते, असे प्रशासनाने पुन्हा स्पष्ट केले आहे. तपासणीदरम्यान अन्न व्यावसायिक परवाना व नोंदणी नियमांतील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने ‘पिंड पंजाब’ आणि ‘बंसल डेअरी’ या दोन्ही आस्थापनांचे परवाने सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी तातडीने निलंबित करण्यात आले. अशा प्रकारच्या भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या खाद्यपदार्थांविरोधात विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला असून नागरिकांनी संशयास्पद प्रकारांची माहिती प्रशासनाच्या मदत क्रमांकावर देण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

हॉटेल्समध्ये मिनरल वॉटरची सक्ती बंद! मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक – तुकाराम मुंढेंचे आदेश

Next Post

स्विगी डिलिव्हरी भागीदारांसाठी मोठी सुविधा; आता १०० रुपयांपासून करता येणार गुंतवणूक!

Next Post
स्विगी डिलिव्हरी भागीदारांसाठी मोठी सुविधा; आता १०० रुपयांपासून करता येणार गुंतवणूक!

स्विगी डिलिव्हरी भागीदारांसाठी मोठी सुविधा; आता १०० रुपयांपासून करता येणार गुंतवणूक!

BreakingNews

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

स्विगी डिलिव्हरी भागीदारांसाठी मोठी सुविधा; आता १०० रुपयांपासून करता येणार गुंतवणूक!

पुण्यात पनीरऐवजी ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर; अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई, परवाने जप्त!

हॉटेल्समध्ये मिनरल वॉटरची सक्ती बंद! मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक – तुकाराम मुंढेंचे आदेश

महाराष्ट्राची डिजिटल झेप : नागरिकांसाठी अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाकडे वाटचाल

पगार हवाय? मग आधी ई-केवायसी करा! जिल्हा परिषद प्रशासनाचा कर्मचाऱ्यांना कडक इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.