Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाण्यातील अनेक भागांत शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 11, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
ठाण्यातील अनेक भागांत शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीएकडून आनंदनगर ते साकेतदरम्यान उभारण्यात येत असलेल्या एलिव्हेटेड रस्त्याच्या कामामुळे इंदिरानगर संकुलाकडे जाणारी ८१३ मि.मी. व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने ९०० मि.मी. व्यासाची नवीन जलवाहिनी अंथरण्याचे काम हाती घेतले असून एकूण २२०० मीटरपैकी ८०० मीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे. आता अस्तित्वातील ८१३ मि.मी. जलवाहिनी निकामी करून नव्याने अंथरण्यात आलेली ९०० मि.मी. जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक जोडणीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी शुक्रवार, १२ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून शनिवार, १३ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली आहे.

या कालावधीत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर पाडा क्रमांक २, ३ व ४, चैतीनगर, परेरानगर, झांजेनगर, श्रीनगर, किसननगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वारलीपाडा, रुपादेवी पाडा, रामनगर, सी.पी. तलाव परिसर तसेच येऊर परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी त्याची नोंद घ्यावी, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याने आवश्यक तेवढा पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

पुण्यात भाडे नाकारणाऱ्या ४८४ रिक्षाचालकांना आरटीओचा दणका; ९ जण निलंबित!

Next Post
पुण्यात भाडे नाकारणाऱ्या ४८४ रिक्षाचालकांना आरटीओचा दणका; ९ जण निलंबित!

पुण्यात भाडे नाकारणाऱ्या ४८४ रिक्षाचालकांना आरटीओचा दणका; ९ जण निलंबित!

BreakingNews

लाडक्या बहिणींना मोठा दिलासा; मे महिन्याचा हप्ता १२ ते १५ जूनदरम्यान खात्यात जमा होणार!

पुण्यात भाडे नाकारणाऱ्या ४८४ रिक्षाचालकांना आरटीओचा दणका; ९ जण निलंबित!

ठाण्यातील अनेक भागांत शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद!

‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.