Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुणेकरांनो, सावधान! महापालिका पुढील ३ महिने करणार ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 8, 2026
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
पुणेकरांनो, सावधान! महापालिका पुढील ३ महिने करणार ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा?
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने महापालिका प्रशासनाने पुढील तीन महिन्यांसाठी पाणी व्यवस्थापनाचे नियोजन सुरू केले आहे. सध्या धरणांमध्ये अवघा ५.५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा पर्याय गंभीरपणे विचाराधीन आहे. यासंदर्भातील प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने महापालिका आयुक्तांकडे सादर केला असून पुढील दोन ते तीन दिवसांत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाच्या अंदाजानुसार सध्याच्या प्रमाणात पाणीपुरवठा सुरू राहिल्यास उपलब्ध साठा जुलै अखेरपर्यंतच पुरू शकतो. त्यामुळे भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील लाखो नागरिकांशी संबंधित हा महत्त्वाचा विषय असल्याने अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पुणे शहराच्या मासिक पाणीगरजेचा विचार करता दरमहा सुमारे १.६० टीएमसी पाणी आवश्यक असते. त्यानुसार पुढील तीन महिन्यांसाठी ४.८० टीएमसी पाण्याची गरज भासणार आहे. याशिवाय या कालावधीत सुमारे १.८० टीएमसी पाणी बाष्पीभवनामुळे कमी होण्याचा अंदाज असून शेतीसाठी सुरू असलेल्या आवर्तनासाठी आणखी ०.८० टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रत्यक्षात धरणांमध्ये किमान ६.६० टीएमसी पाणीसाठा असणे अपेक्षित आहे. मात्र उपलब्ध साठा त्यापेक्षा कमी असल्याने प्रशासनाला पाणी कपातीचा पर्याय विचारात घ्यावा लागत आहे. दरम्यान, जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी शहरात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावलेली नाही. तसेच मान्सूनलाही सुमारे दोन आठवड्यांचा विलंब होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाणी बचतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. योग्य नियोजन आणि पाणी वापरावर नियंत्रण ठेवल्यास संभाव्य टंचाईचा सामना करणे अधिक सोपे होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Previous Post

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत! – बच्चू कडूंचे विधान

Next Post

इराण-इस्रायल संघर्ष पुन्हा भडकला; भारतीयांना इराण सोडण्याचा सल्ला

Next Post
इराण-इस्रायल संघर्ष पुन्हा भडकला; भारतीयांना इराण सोडण्याचा सल्ला

इराण-इस्रायल संघर्ष पुन्हा भडकला; भारतीयांना इराण सोडण्याचा सल्ला

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.