Lokrakshanay
Thursday, June 4, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘गिफ्ट ऑफ लाईफ’ मोहिमेतून ८५० हून अधिक बालकांना नवे जीवन; सुनील गावस्कर भावूक

रोटरी आणि सत्य साई संजीवनी सेंटरचा उल्लेखनीय उपक्रम

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 3, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
‘गिफ्ट ऑफ लाईफ’ मोहिमेतून ८५० हून अधिक बालकांना नवे जीवन; सुनील गावस्कर भावूक
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या वंचित बालकांना नवे आयुष्य देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ मोहिमेअंतर्गत ८५० हून अधिक मुलांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. या निमित्ताने जुहू येथील रोटरी सेवा केंद्रात आयोजित विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी उपस्थित राहून शस्त्रक्रिया झालेल्या मुलांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला. ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट’ आणि श्री सत्य साई संजीवनी बाल हृदय काळजी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बोलताना गावस्कर म्हणाले की, या मुलांचा संघर्ष आणि त्यांच्यासाठी डॉक्टर व स्वयंसेवकांनी केलेले निस्वार्थ कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. योग्य वेळी मिळालेली मदत आणि दातृत्व यामुळे शेकडो मुलांचे प्राण वाचू शकतात, हे पाहून मन भरून येते. त्यांच्या मते, ही मुलेच खरे हिरो आहेत. गेल्या सहा वर्षांत या उपक्रमासाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला असून शेकडो मुलांना अत्यावश्यक वैद्यकीय उपचार मिळाले आहेत.

‘गिफ्ट ऑफ लाईफ’ प्रकल्पाचे अध्यक्ष नितीन मेहता यांनी सांगितले की, प्रत्येक मुलाला निरोगी आयुष्याचा अधिकार आहे आणि आर्थिक अडचणींमुळे कोणतेही मूल उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी संस्था सातत्याने प्रयत्न करत आहे. शस्त्रक्रियेनंतर मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारे हास्य हेच सर्वात मोठे समाधान असल्याचे त्यांनी नमूद केले. बालहृदयविकार शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख डॉ. प्रभाता रश्मी यांनी सांगितले की, भारतात दरवर्षी दोन लाखांहून अधिक मुले जन्मजात हृदयविकारासह जन्माला येतात. त्यापैकी सुमारे ७० हजार मुलांना पहिल्याच वर्षात शस्त्रक्रियेची आवश्यकता असते; मात्र गरिबी आणि उशिरा निदानामुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. या मोहिमेला जर्मनीतील रोटरी क्लब ऑफ बर्लिन इंटरनॅशनल, मध्ये रोटरी क्लब ऑफ फोर्ट वेन तसेच विविध रोटरी क्लब आणि रोटरी इंटरनॅशनल च्या वर्ल्ड फंडचे सहकार्य लाभले आहे. शेकडो कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारी ही मोहीम समाजसेवेचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

Previous Post

शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी रायगडावर मनसे आक्रमक; स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेवरून आंदोलनाचा इशारा

Next Post

नरिमन पॉईंटची ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत शासनाच्या ताब्यात; दुरुस्तीनंतर होणार शासकीय वापर

Next Post
नरिमन पॉईंटची ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत शासनाच्या ताब्यात; दुरुस्तीनंतर होणार शासकीय वापर

नरिमन पॉईंटची ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत शासनाच्या ताब्यात; दुरुस्तीनंतर होणार शासकीय वापर

BreakingNews

ठाण्यात FDA ची मोठी कारवाई; ११ लाखांचे आंबे जप्त, ३७ जणांना अटक

गोव्यातील मंगेशीत उभारले जाणार लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे भव्य स्मारक

रेल्वे अपघात रोखण्यासाठी भिवंडीत देशातील पहिला जलरोधक सबवे!

‘दृश्यम ३’मध्ये पुन्हा उलगडणार रहस्यांचा खेळ; अजय देवगणच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट

नरिमन पॉईंटची ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत शासनाच्या ताब्यात; दुरुस्तीनंतर होणार शासकीय वापर

‘गिफ्ट ऑफ लाईफ’ मोहिमेतून ८५० हून अधिक बालकांना नवे जीवन; सुनील गावस्कर भावूक

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.