Lokrakshanay
Tuesday, May 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘देऊळ बंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; आता परीक्षा देवाची!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 19, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन, मुंबई
‘देऊळ बंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; आता परीक्षा देवाची!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : देऊळ बंद २ या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग २१ मे २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. प्रवीण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित आणि ‘वटवृक्ष एण्टरटेन्मेंट’ निर्मित या चित्रपटाची टॅगलाईन “आता परीक्षा देवाची…” अशी असून, श्रद्धा, सामाजिक वास्तव आणि मानवी संघर्ष यांचा प्रभावी संगम यात पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये एका शेतकरी महिलेच्या माध्यमातून दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि ग्रामीण भागातील कठोर वास्तव यांसारख्या गंभीर प्रश्नांची मांडणी करण्यात आली आहे. “या देशात सगळं ओरिजनल आहे, डुप्लिकेट फक्त शेतकरी!” तसेच “पुढच्या आठ दिवसांत एकही आत्महत्या झाली नाही पाहिजे… नाहीतर माझं देऊळ बंद कायमचं!” यांसारखे संवाद ट्रेलरमधील ठळक आकर्षण ठरत आहेत. श्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यातील संघर्ष दाखवतानाच देवाच्या अस्तित्वालाच प्रश्न विचारण्याचे धाडस या चित्रपटात करण्यात आले आहे.

मोहन जोशी हे पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत दिसणार असून, स्नेहल तरडे आणि स्वतः प्रवीण विठ्ठल तरडे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. प्रवीण तरडे यांनी साकारलेला ‘सदूशेठ’ हा १०० तोंडांच्या रावणासारखा व्यक्तिरेखा विशेष चर्चेत आहे. चित्रपटात महेश मांजरेकर, प्रसाद ओक, ओम भूतकर, मंगेश देसाई, सविता मालपेकर, अतुल कुदळे, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुनील अभ्यंकर, जगन्नाथ निवंगुणे आणि संस्कृती बालगुडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती कैलास वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी–सूर्यवंशी यांनी केली आहे. ग्रामीण भागाचे वास्तववादी चित्रीकरण, प्रभावी पार्श्वसंगीत आणि सामाजिक संदेशामुळे हा चित्रपट कौटुंबिक प्रेक्षकांसाठी विशेष पर्वणी ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Previous Post

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘सूर्या’ बिबट्याचा मृत्यू!

Next Post

मुंबईकरांना महागाईचा झटका! इंधन दरवाढीपाठोपाठ आता मुंबईकरांचा लाडका वडापावही महागला

Next Post
मुंबईकरांना महागाईचा झटका! इंधन दरवाढीपाठोपाठ आता मुंबईकरांचा लाडका वडापावही महागला

मुंबईकरांना महागाईचा झटका! इंधन दरवाढीपाठोपाठ आता मुंबईकरांचा लाडका वडापावही महागला

BreakingNews

मुंबईकरांना महागाईचा झटका! इंधन दरवाढीपाठोपाठ आता मुंबईकरांचा लाडका वडापावही महागला

‘देऊळ बंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; आता परीक्षा देवाची!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘सूर्या’ बिबट्याचा मृत्यू!

तमिळनाडूच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्री विजय यांच्याकडे गृह खाते

ठाणे जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार रोखण्यासाठी उभारणार चेकनाके

‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ची राज्यस्तरीय घोषणा; पहिला पुरस्कार अजित पवारांच्या नावाने!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.