Lokrakshanay
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

राज्यात पुण्यात सर्वाधिक ९१ रुग्ण; जेएन.१ चा धोका वाढला!

राज्यातील एकूण रुग्णसंख्या ११० वर पोहोचली असून, त्यातील तब्बल ९१ रुग्ण पुण्यात आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 5, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
राज्यात पुण्यात सर्वाधिक ९१ रुग्ण; जेएन.१ चा धोका वाढला!
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ चे राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ११० वर पोहोचली असून, त्यातील तब्बल ९१ रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात मागील २४ तासांत जेएन.१ च्या ७२ रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात जेएन.१ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर पुण्यासह ठाण्यामध्ये काही रुग्ण सापडले होते. राज्यात जेएन.१ चे गुरुवारी पुण्यात ७२ आणि नांदेड २, सोलापूर १, नागपूर १ असे ७८ नवीन रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. राज्यातील जेएन.१ च्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्क्यांहून अधिक पुण्यात आहेत. पुण्यातील ही रुग्णसंख्या ९१ वर पोहोचली आहे. त्याखालोखाल ठाण्यात ५ रुग्ण असून, बीड ३, छत्रपती संभाजीनगर २, नांदेड २, कोल्हापूर १, अकोला १, सिंधुदुर्ग १, नाशिक १, सातारा १, सोलापूर १, नागपूर १ अशी रुग्णसंख्या आहे. दरम्यान, पुण्यात गुरुवारी करोनाचे १५ नवीन रुग्ण आढळले.

राज्यात मागील २४ तासांत करोनामुळे दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. सोलापूरमधील एक मृत्यू दिनांक ३१ डिसेंबर रोजी खासगी दवाखान्यात झाला असून, त्या रुग्णाचे वय ७३ वर्ष होते. तसेच त्या रुग्णाला मधुमेह, रक्तदाब आणि दमा हे सहव्याधी आजार होते. या व्यक्तीने करोना लशीच्या दोन मात्रा घेतल्या होत्या. कोल्हापूरमधील एक मृत्यू ३ जानेवारीला खासगी दवाखान्यात झाला असून, त्याचे वय १०१ वर्ष होते. तसेच त्या रुग्णाला हृदयरोग होता. त्याने करोना लशीची मात्रा घेतली नव्हती. “राज्यात १ ते २८ डिसेंबर २०२३ या कालावधीतील आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात आले. त्याचा अहवाल ३ जानेवारीला मिळाला असून, त्यात ७८ जणांना जेएन.१ चा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.”

Previous Post

‘शून्य औषध चिठ्ठी योजने’साठी पालिका रुग्णालयात एक हजार कोटींची तरतूद!

Next Post

कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

BreakingNews

लाडकी बहीण ई-केवायसीला ६ महिन्यांची मुदतवाढ!

पेपरफुटीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार; दोषींना १० वर्षे तुरुंगवास अन् १० कोटी रुपयांचा दंड!

धर्मेंद्र प्रधानांनंतर नितीन गडकरी विरोधकांच्या निशाण्यावर? उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांची केंद्रीय मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी

कल्याण-डोंबिवलीत विनापरवाना पॉलीक्लिनिकवर छापा; १.०३ लाखांचा औषधसाठा जप्त करत FDAचा दणका

बस कंडक्टर ते भारतीय सिनेसृष्टीचे ‘थलायवा’; सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी येणार रुपेरी पडद्यावर?

गोपाळगड किल्ला अखेर शासनाच्या ताब्यात! पर्यटकांचा मुक्त प्रवेशाचा मार्ग मोकळा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.