Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home कोकण

गिरगाव चौपाटीवर रंगणार कोकणी मेळावा! २४ एप्रिलपासून ‘मँगो फेस्टिव्हल’ आणि ‘प्रॉपर्टी शो’ची मेजवानी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 9, 2026
in कोकण, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
गिरगाव चौपाटीवर रंगणार कोकणी मेळावा! २४ एप्रिलपासून ‘मँगो फेस्टिव्हल’ आणि ‘प्रॉपर्टी शो’ची मेजवानी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : गिरगाव चौपाटी परिसरात येत्या २४ एप्रिलपासून ‘मँगो फेस्टिव्हल २०२६’ आणि ‘कोकण प्रॉपर्टी’ प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. Yuva Vision आणि Brands Maker यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात असून मुंबईकरांना अस्सल कोकणी हापूसची चव आणि कोकणातील गुंतवणुकीच्या संधी एकाच ठिकाणी अनुभवता येणार आहेत. या महोत्सवाच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी शेतकरी आणि ग्राहक यांना थेट जोडणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तसेच, या महोत्सवामुळे कोकणातील आंबा उत्पादकांना योग्य बाजारपेठ मिळेल आणि ‘कोकण प्रॉपर्टी’ प्रदर्शनामुळे गुंतवणूकदारांना एकाच छताखाली माहिती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

हे प्रदर्शन २४ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत मॅकिचन ग्राउंड आणि हॉल येथे पार पडणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मुंबईकरांना थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून दर्जेदार हापूस आंबे खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे, त्यांची गुणवत्ता आणि थेट विक्री यामुळे ग्राहकांना विश्वासार्ह खरेदीचा अनुभव मिळेल. यासोबतच ‘कोकण प्रॉपर्टी’ प्रदर्शनात कोकणातील रिअल इस्टेट क्षेत्रातील विविध पर्याय मांडले जाणार आहेत. सेकंड होम, गुंतवणूक प्रकल्प आणि पर्यटनाशी निगडित प्रॉपर्टी याबाबत सविस्तर माहिती येथे उपलब्ध असेल. त्यामुळे कोकणात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हा उपक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. महोत्सवात कोकणी खाद्यसंस्कृतीलाही विशेष स्थान देण्यात आले आहे. आंब्यांव्यतिरिक्त कोकणातील पारंपरिक खाद्यपदार्थ आणि उत्पादनेही येथे उपलब्ध असतील. आयोजकांच्या मते, मुंबईकरांचा कोकणाशी असलेला जिव्हाळा लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला असून जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे

Previous Post

अग्निशमन दल, स्वच्छता आणि उद्यान विभागाच्या ताफ्यात नव्या यंत्रसामग्रीचा समावेश; आपत्कालीन मदतीसाठी ठाणेकर सज्ज

Next Post

लोकलमधील महिलांच्या सुरक्षेसाठी आता ‘सखी’ची साथ! ११ व्हॉट्सअॅप ग्रुप्सद्वारे अवघ्या काही मिनिटांत मिळणार मदत

Next Post
लोकलमधील महिलांच्या सुरक्षेसाठी आता ‘सखी’ची साथ! ११ व्हॉट्सअॅप ग्रुप्सद्वारे अवघ्या काही मिनिटांत मिळणार मदत

लोकलमधील महिलांच्या सुरक्षेसाठी आता 'सखी'ची साथ! ११ व्हॉट्सअॅप ग्रुप्सद्वारे अवघ्या काही मिनिटांत मिळणार मदत

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.