Lokrakshanay
Sunday, May 31, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

अग्निशमन दल, स्वच्छता आणि उद्यान विभागाच्या ताफ्यात नव्या यंत्रसामग्रीचा समावेश; आपत्कालीन मदतीसाठी ठाणेकर सज्ज

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 9, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
अग्निशमन दल, स्वच्छता आणि उद्यान विभागाच्या ताफ्यात नव्या यंत्रसामग्रीचा समावेश; आपत्कालीन मदतीसाठी ठाणेकर सज्ज
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे म्हापलिका अग्निशमन, घनकचरा आणि उद्यान विभागांमध्ये नवीन ‘हायटेक’ वाहने दाखल झाली आहेत. यात उंच इमारतींमधील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागात आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर वाहने, शहरातील रस्ते स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी आधुनिक रोड स्वीपर मशिन्स, तसेच उद्यान विभागामध्ये धोकादायक वृक्षाच्या फांद्या छाटण्यासाठी हायड्रॉलिक एरियल लिफ्ट या वाहनांचा समावेश आहे. यामुळे आता आग विझवणे, रस्ते साफसफाई आणि झाडांच्या फांद्या छाटणी सुपरफास्ट होणार आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागांसाठी अत्याधुनिक वाहनांचा मोठा ताफा शहरात दाखल झाला असून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते बुधवारी या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या यंत्रणेमुळे शहरातील आपत्कालीन सेवा, स्वच्छता आणि पावसाळ्यापूर्वीची तयारी अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण तसेच पालिका अधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे अग्निशमन विभागाची एकूण १२ अग्निशमन केंद्रे चोवीस तास कार्यरत असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित सेवा देण्याचे काम सातत्याने केले जात आहे. ही यंत्रणा अधिक सक्षम व्हावी यासाठी अद्ययावत आणि सुसज्ज फायर वाहने ताफ्यात समाविष्ट करण्यात आली असल्याचे महापौर पिंपळोलकर यांनी स्पष्ट केले. ही वाहने पूर्णपणे स्वयंचलित स्वरूपाची आहेत. प्रत्येक वाहनामध्ये चार हजार लिटर पाण्याची क्षमता आहे. तसेच, प्रथमच मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर वाहनेही ठाणे अग्निशमन दलात दाखल झाली असून ३५ मीटर उंचीपर्यत पोहचून आग विझवण्याची क्षमता या वाहनांची आहे. यामुळे उंच इमारतींमधील आगीवर नियंत्रण मिळवणे आता अधिक सोपे होणार आहे, असा दावा पालिकेने केला आहे.

Previous Post

अमेरिका-इराण युद्ध दोन आठवड्यांसाठी थांबले; पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर ट्रम्प यांची घोषणा

Next Post

गिरगाव चौपाटीवर रंगणार कोकणी मेळावा! २४ एप्रिलपासून ‘मँगो फेस्टिव्हल’ आणि ‘प्रॉपर्टी शो’ची मेजवानी

Next Post
गिरगाव चौपाटीवर रंगणार कोकणी मेळावा! २४ एप्रिलपासून ‘मँगो फेस्टिव्हल’ आणि ‘प्रॉपर्टी शो’ची मेजवानी

गिरगाव चौपाटीवर रंगणार कोकणी मेळावा! २४ एप्रिलपासून 'मँगो फेस्टिव्हल' आणि 'प्रॉपर्टी शो'ची मेजवानी

BreakingNews

‘देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार ‘मुळशी पॅटर्न २’

मुंबई महापालिकेची डिजिटल झेप; भारतातील पहिली एआय आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

मुंबईत CNG-PNG दरवाढीचा आणखी झटका; १५ दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

ईदनिमित्त ‘मैं हूँ…’ गाण्याची खास भेट; सलमान खानचा रोमँटिक अंदाज चर्चेत!

१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; नर्दुल्ला टँक मैदान वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.