Lokrakshanay
Friday, July 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पालघरमध्ये इंधन संकट? इंधन टंचाईने नागरिक हैराण; वाहनांच्या लांबच लांब रांगा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 26, 2026
in ताज्या बातम्या, पालघर
पालघरमध्ये इंधन संकट? इंधन टंचाईने नागरिक हैराण; वाहनांच्या लांबच लांब रांगा
Share on FacebookShare on Whatsapp

पालघर : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे सावट आता स्थानिक स्तरावरही जाणवू लागले आहे. गॅसच्या तुटवड्यानंतर आता पालघर शहरात पेट्रोल आणि डिझेलची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील दोन्ही मुख्य पेट्रोल पंपांवर इंधन साठा संपल्याने वाहनचालकांचे प्रचंड हाल होत असून, पंपांवर ‘पेट्रोल-डिझेल संपले’चे फलक झळकले आहेत.

आज सकाळपासूनच पालघर शहरात इंधनाचा खडखडाट जाणवत होता. पालघर-बोईसर मार्गावरील औद्योगिक वसाहतीसमोरील हिंदुस्तान पेट्रोलियम चे पेट्रोल पंप आणि शहरातील भारत पेट्रोलियम पंप या दोन्ही ठिकाणी इंधनाचा साठा संपला आहे. सकाळी दोन्ही पंपांवरील डिझेलचा साठा पूर्णपणे संपला होता, तर दुपारनंतर पेट्रोलही संपल्याने पंपांवर बॅरिकेड्स लावून सेवा बंद करण्यात आली. यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांना आणि वाहनचालकांना रिकाम्या हाती परतावे लागले. केवळ पालघर शहरच नव्हे, तर नजीकच्या उमरोळी येथील पेट्रोल पंपावरही डिझेल संपल्याने अवजड वाहतूक आणि शेतीकामांवर परिणाम झाला आहे. गॅस टंचाईनंतर आता पेट्रोल-डिझेलचाही मोठा तुटवडा होणार असून दरवाढ होणार असल्याची अफवा नागरिकांमध्ये पसरली होती. या भीतीपोटी काल (मंगळवारी) रात्री पालघर येथील भारत पेट्रोलियमच्या पंपाबाहेर रात्री दीड वाजेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, पालघरमधील भारत पेट्रोलियमच्या वितरक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नियमितपणे सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Previous Post

व्हॉट्सॲपचा धमाका! फक्त १५ मिनिटांत चॅट होणार गायब

Next Post

शिवचरित्राचा भाष्यकार हरपला! ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

Next Post
शिवचरित्राचा भाष्यकार हरपला! ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

शिवचरित्राचा भाष्यकार हरपला! ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

BreakingNews

अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर

डिजिटल व्यवस्थेचा ज्येष्ठ नागरिकांना फटका; बोटांचे ठसे न जुळल्याने एसटीच्या सवलतीला मुकण्याची वेळ!

विनातिकीट फिरणाऱ्यांना १६ कोटींचा फटका! मध्य रेल्वेने ४० दिवसांत पकडले २ लाख प्रवासी

मलबार हिल निसर्ग उन्नत मार्ग ऑगस्टअखेरपर्यंत पर्यटकांसाठी बंद!

डॉ. निलेश साबळेची नव्या शोची चाहूल; ‘काहीतरी मॅड येतंय लवकरच’ पोस्टने चाहत्यांमध्ये उत्सुकता

पारशी डेअरीवर FDA ची मोठी पकड! दूध भेसळप्रकरणी परवाना निलंबित, दोघांना बेड्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.