Lokrakshanay
Sunday, July 5, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नो इंटरनेट, नो टेन्शन! आता इंटरनेटशिवाय करा UPI पेमेंट; पाहा संपूर्ण प्रोसेस

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 23, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश
नो इंटरनेट, नो टेन्शन! आता इंटरनेटशिवाय करा UPI पेमेंट; पाहा संपूर्ण प्रोसेस
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : सध्याच्या काळात डिजीटल पेमेंट आपल्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनला आहे. भाजी खरेदी करण्यापासून हॉटेलचे बिल भरण्यापर्यंत सर्व कामांसाठी डिजीटल पेमेंट पद्धतीचा वापर केला जातो. गुगल पे, फोनपे, पेटिएम आणि भिम यासांरख्या प्लॅटफॉर्म्समुळे ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करणं अधिक सोपं झालं आहे. ऑनलाईन व्यवहार पूर्ण करण्यासाठी दोन गोष्टी सर्वात जास्त महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे बँक अकाऊंट आणि दुसरे म्हणजे इंटरनेट. इंटरनेट नसेल तर ऑनलाईन पेमेंट करणं कठीण होऊन बसतं. यूजर्सची हीच समस्या लक्षात घेऊन एक नवीन फीचर जारी करण्यात आलं आहे. या फीचरबाबत अत्यंत कमी लोकांना माहिती आहे.

जारी करण्यात आलेल्या नवीन फीचरच्या मदतीने यूजर्स इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करू शकणार आहेत. ही सुविधा 2022 मध्ये नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे सुरु करण्यात आली होती. या फीचरचा वापर करून यूजर्स खराब नेटवर्क असलेल्या ठिकाणी देखील अगदी सहजपणे व्यवहार करू शकणार आहेत. ऑफलाईन पेमेंट करण्याची प्रोसेस देखील अत्यंत सोपी आहे. ही सुविधा USSD कोडद्वारे काम करते. याचा अर्थ असा आहे की, जर तुमच्या फोनमध्ये कॉल करण्याची सुविधा असेल तर तुम्ही इंटरनेटशिवाय देखील व्यवहार पूर्ण करू शकतात. यामध्ये कोणताही अ‍ॅप ओपन करण्याची किंवा क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नसते. यामध्ये तुम्हाला केवळ एक कोड डायल करावा लागतो आणि त्यानंतर स्क्रीनवर एक मेन्यू दिसतो. इथे तुम्ही व्यवहार पूर्ण करू शकता. ही पद्धत थोडी पारंपरिक वाटू शकते, पण नेटवर्क नसताना ती खूप उपयुक्त ठरते.

इंटरनेटशिवाय पेमेंट करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स :

  • ऑफलाइन UPI पेमेंट करणं अत्यंत सोपं आहे. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
  • तुमच्या फोनमधून *99# डायल करा.
  • आता स्क्रीनवर एक मेन्यू ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय दिसतील.
  • यामध्ये तुम्हाला सेंड मनी पर्याय निवडावा लागेल.
  • आता तुम्ही मोबाईल नंबर, UPI आयडी किंवा बँक खात्याद्वारे पैसे पाठवू शकता.
  • मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर व्यक्तीचे नाव स्क्रीनवर दिसेल.
  • नाव कन्फर्म केल्यानंतर रक्कम एंटर करा.
  • आता यूपीआय पिन एंटर करा आणि तुमचा व्यवहार पूर्ण होणार आहे.
  • संपूर्ण प्रक्रिया काही सेकंदात पूर्ण होते आणि त्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नसते.
Previous Post

सिलिंडरमधून ४ किलो गॅस ‘गायब’ होणार? केवळ ८ ते १० किलो गॅस भरण्याचे कंपन्यांना केंद्राचे आदेश

Next Post

संरक्षण क्षेत्रातील शिक्षणासाठी केंद्र सरकारचा मेगा प्लॅन; देशभरात १०० नवीन सैनिकी शाळांना मंजुरी

Next Post
संरक्षण क्षेत्रातील शिक्षणासाठी केंद्र सरकारचा मेगा प्लॅन; देशभरात १०० नवीन सैनिकी शाळांना मंजुरी

संरक्षण क्षेत्रातील शिक्षणासाठी केंद्र सरकारचा मेगा प्लॅन; देशभरात १०० नवीन सैनिकी शाळांना मंजुरी

BreakingNews

‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेत धडक कारवाई; पुणे-सोलापुरात सव्वा लाखांचा साठा जप्त!

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आंबेनळी घाट ५ दिवस बंद!

पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्या; संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी महापालिकेचे आवाहन!

साकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबाला १० लाखांची मदत; दोषींवर कठोर कारवाईचा महापौरांचा इशारा!

शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे जिल्हा परिषद शाळांची चमकदार कामगिरी; ५ वी व ८ वीतील ३९५ विद्यार्थी पात्र!

लंडनमध्ये उभारले जाणार ‘वैश्विक मराठी भाषा केंद्र’ – उदय सामंत यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.