वृत्तसंस्था : मागील काही दिवसांता भाज्यांचे दर घटले आहेत. यामुळे सर्वसामान्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. भाज्यांचे दर कमी जास्त होत असल्याचे आपण नेहमीच पाहतो. पहिल्यांदाच कोंथिबीरसोबत फुकट मिळणारा कढीपत्ता अचनाक महाग झाला आहे. कढीपत्त्याचा दर अचानक ६०० रुपये किलो झाला आहे. बाजारात कढीपत्त्याची आवक घटली आहे. कढीपत्त्याचे दर वाढल्याने गृहीणी आश्चर्यचकित झाल्या आहेत.
जेवणाचा स्वाद वाढण्यासाठी खमंग फोडणीत कढीपत्ता आवर्जून घातला जातो. पदार्थाची चव वाढणारा कढीपत्ता किचन मधून बाहेर जाणार आहे. कारण अचानक कढीपत्त्याचे दर वाढले आहेत. कोंथिबीरसोबत फुकट मिळणारा कढीपत्ता अचानक ६०० रुपये किलो झाला आहे. कढीपत्त्याचा वापर फक्त जेवणातच नाही तर औषधी वनस्पती म्हणून देखील केला जातो. यामुळे कढीपत्त्याला बाजारात मोठी मागणी असते.मात्र, आजपर्यंत कढीपत्ता कधीच इतका महाग झाला नव्हता. मागील काही आठवड्यात कढीपत्त्याचा दर २०० रुपये प्रती किलो पर्यंत पोहचला होता. एक जुडी २५ रुपयांना मिळत होती. आता मात्र, कढीपत्त्याचा दर ६०० रुपये किलोवर पोहचला आहे. एका जुडीचा दर ५० रुपयांवर गेला आहे. २२ फेब्रुवारी रोजी स्थानिक भाजी विक्रेत्यांनी ही माहिती दिली. अनेक किरकोळ विक्रेत कढीपत्ता विक्रीसाठी ठेवणे टाळत आहेत. परवडत नसल्याने कढीपत्त्या आणत नसल्याचे या विक्रेत्यांनी सांगितले. यामुळे बाजारातून कढीपत्ता गायब झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल तसेच डिझेलच्या दर वाढले आहेत. यामुळे वाहतूक खर्च वाढल्याचा परिणाम कढीपत्त्या किंमतीवर होत आहे. वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहक आता घरीच कुंडीत कढीपत्त्याचे रोप लावण्यास प्राधान्य देत आहेत.

