Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home कोकण

शिमगोत्सवासाठी चाकरमान्यांसाठी ‘लालपरी’ सज्ज! कोकणाच्या दिशेला १९८ जादा फेऱ्या

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 18, 2026
in कोकण, ताज्या बातम्या, मुंबई
शिमगोत्सवासाठी चाकरमान्यांसाठी ‘लालपरी’ सज्ज! कोकणाच्या दिशेला १९८ जादा फेऱ्या
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : ‘गाव तेथे एसटी’ या ब्रीद वाक्यानुसार महानगर आणि खेडेगावांना ‘लालपरी’ची सेवा जोडलेली आहे. होळीच्या काळात प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, वेगवान, स्वस्त व्हावा यासाठी एसटी महामंडळाने वाढीव फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अचूक अंदाज घेऊन एसटी महामंडळाने ‘होळी जादा ऑपरेशन २०२६’अंतर्गत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या विभागांतून तब्बल १९८ जादा फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे.

‘लालपरी’ २७ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत कोकणाच्या दिशेने अधिक वेगाने धावणार असून, होळीनिमित्त हजारो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ व्हावा यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या विशेष मोहिमेत सर्वाधिक फेऱ्यांचे नियोजन ठाणे आणि मुंबई विभागांतून करण्यात आले आहे. ठाणे विभागातून तब्बल ७९ फेऱ्या नियोजित असून, त्यापैकी ७१ फेऱ्या आगाऊ आरक्षणामुळे आधीच पूर्ण क्षमतेने सज्ज झाल्या आहेत. मुंबई विभागातून ६२ फेऱ्या नियोजित असून, ३७ फेऱ्यांचे आरक्षण झाले आहे. तर २५ फेऱ्या गट आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पालघर विभागातून २४ फेऱ्या पूर्णपणे गट आरक्षणाच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहेत. रायगड विभागातून ३३ फेऱ्या होणार असून, त्या सर्व आरक्षित प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. या विशेष मोहिमेतील सर्वाधिक गर्दी २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दोन दिवशी अपेक्षित आहे. २८ फेब्रुवारी रोजी तब्बल ९१ फेऱ्या, तर १ मार्च रोजी ५९ फेऱ्या नियोजित केल्या आहेत. होळीच्या पूर्वसंध्येला गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने एसटी प्रशासनाने या दिवसांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

Previous Post

भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

Next Post

रायगड प्रेमींनो लक्ष द्या! ६ दिवस रोप-वे सेवा खंडीत; पायथ्यापासूनच करावी लागणार चढाई

Next Post
रायगड प्रेमींनो लक्ष द्या! ६ दिवस रोप-वे सेवा खंडीत; पायथ्यापासूनच करावी लागणार चढाई

रायगड प्रेमींनो लक्ष द्या! ६ दिवस रोप-वे सेवा खंडीत; पायथ्यापासूनच करावी लागणार चढाई

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.