Lokrakshanay
Friday, July 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

राज्यातील आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी अनुभवणार ‘इस्रो’ सफरी!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 14, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
राज्यातील आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी अनुभवणार ‘इस्रो’ सफरी!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यातील विविध आश्रम शाळेतील तब्बल १०० विद्यार्थी लवकच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या सफरीवर जाणार आहेत. विज्ञान प्रेरणा अभियानात चांगली कामगिरी करणाऱ्या अशा विद्यार्थ्यांसाठी १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान या सहलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी जिज्ञासा, संशोधनाची वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून त्या संधीं ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी सरकारने विशेष उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमासाठी आश्रमशाळांमधून गुणवत्ता परीक्षेद्वारे १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना इस्रो येथे भेट देऊन उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण तंत्रज्ञान, प्रत्यक्ष रॅाकेटचे प्रक्षेपण पाहणे आणि अंतराळ संशोधन प्रकल्पांविषयी प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच विज्ञानविषयक कार्यशाळा आणि शास्त्रज्ञांशी, तज्ज्ञांशी संवादाच्या माध्यमातून त्यांना अनुभवाधारित शिक्षणाचा लाभ होणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संस्थांशी जोडणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि उच्च शिक्षणाच्या संधींबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले.

 

Previous Post

Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून १ कोटी रुपयांची मागणी

Next Post

१० दिवसात फुटपाथवरील झोपड्या हटवा; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला फटकारे

Next Post
१० दिवसात फुटपाथवरील झोपड्या हटवा; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला फटकारे

१० दिवसात फुटपाथवरील झोपड्या हटवा; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला फटकारे

BreakingNews

विनातिकीट फिरणाऱ्यांना १६ कोटींचा फटका! मध्य रेल्वेने ४० दिवसांत पकडले २ लाख प्रवासी

मलबार हिल निसर्ग उन्नत मार्ग ऑगस्टअखेरपर्यंत पर्यटकांसाठी बंद!

डॉ. निलेश साबळेची नव्या शोची चाहूल; ‘काहीतरी मॅड येतंय लवकरच’ पोस्टने चाहत्यांमध्ये उत्सुकता

पारशी डेअरीवर FDA ची मोठी पकड! दूध भेसळप्रकरणी परवाना निलंबित, दोघांना बेड्या

१८ महिन्यांचा रेकॉर्ड दाखवा! पोलीस ठाण्यांतील CCTV फुटेजबाबत उच्च न्यायालयाचे कडक पाऊल

मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या एका तासात! १५ ऑगस्टपासून चिपी विमानतळावरून नवी उड्डाणे

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.