Lokrakshanay
Friday, May 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

१२वीतील सोहमचा रेल्वे अपघातात मृत्यूप्रकरणी काळे कपडे घालून प्रवास करण्याचे प्रवासी संघटनांचे आवाहन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 11, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
१२वीतील सोहमचा रेल्वे अपघातात मृत्यूप्रकरणी काळे कपडे घालून प्रवास करण्याचे प्रवासी संघटनांचे आवाहन
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील कळवा आणि मुंब्रा स्थानका दरम्यान १२ वीच्या विद्यार्थ्याचा परीक्षा केंद्रावर जाताना रेल्वे रुळावर मृतदेह आढळला. सोहम कठरे (१८) असे मृत मुलाचे नाव असून रेल्वेगाडीतील गर्दीमुळे तोल जाऊन त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोहम याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रवासी संघटनांनी देखील आक्रमक भूमिका घेऊन रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदविला. तसेच निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी (आज) काळे कपडे किंवा काळी मुखपट्टी वापरून प्रवास करण्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे.

सोहम कठरे हा १२ वी मध्ये विज्ञान शाखेतून कळवा येथील न्यू कळवा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. १२ वीच्या परीक्षा सुरु झाल्याने त्याचे कळवा येथील मनीषा विद्यालय शाळेमध्ये परीक्षा केंद्र होते. सोहमच्या वडिलांचे कळवा येथे सराफाचे दुकान होते. परंतु वैयक्तिक कारणामुळे सोहम आणि त्याचे कुटुंब डोंबिवली येथील आजदेगाव भागात महिन्याभरापूर्वीच वास्तव्यास गेले. १२ वीची परीक्षा सुरु झाल्याने तो डोंबिवली येथून कळवा येथे परीक्षा देण्यासाठी निघाला होता. मंगळवारी सकाळी तो जखमी अवस्थेत कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रुळांजवळ आढळून आला. घटनेची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सोहम याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हा अपघात रेल्वेतील गर्दीमुळे तोल गेल्याने झाला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघाता प्रकरणातील प्रत्यक्षदर्शींचा शोध सुरु असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर प्रवासी संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरवर्षी शेकडो नागरिकांचा रेल्वे अपघातात मृत्यू होतो. आता अवघ्या १८ वर्षांच्या सोहमचा मृत्यू झाल्याने प्रवासी संघटनांकडून निषेध व्यक्त केला.

Previous Post

गुंतवणुकीच्या फसवणूकीप्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदेसोबत १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

Snapchat ला टक्कर देण्यासाठी लवकरच येणार Meta चं नवं ‘Instants’ अ‍ॅप!

Next Post
Snapchat ला टक्कर देण्यासाठी लवकरच येणार Meta चं नवं ‘Instants’ अ‍ॅप!

Snapchat ला टक्कर देण्यासाठी लवकरच येणार Meta चं नवं ‘Instants’ अ‍ॅप!

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.