Lokrakshanay
Thursday, July 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

देशातील पुणे ठरले सर्वाधिक धुके असलेले विमानतळ

विमानतळावरील डिजिटल माहिती फलकांवर याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या, अशी तक्रार अनेक प्रवाशांनी केली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 9, 2023
in ताज्या बातम्या, पुणे
देशातील पुणे ठरले सर्वाधिक धुके असलेले विमानतळ
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पुणे विमानतळ हे देशातील सर्वाधिक धुके असलेले विमानतळ ठरले. या खराब हवामानाचा फटका विमानसेवेला बसला. पुणे विमानतळावर येणारी विमाने दुसरीकडे वळविण्यात आली तर अनेक विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. पुणे विमानतळ परिसरात सकाळी मोठ्या प्रमाणात धुके होते. त्यामुळे सर्वसाधारण दृश्यमानता ५० मीटरवर आली. याचवेळी धावपट्टीची दृश्यमानता १५० मीटरवर आली. त्यामुळे सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास इंडिगोचे दिल्ली-पुणे हे विमान मुंबईला वळविण्यात आले. याचबरोबर विस्ताराचे दिल्ली-पुणे विमानही मुंबईला वळविण्यात आले. प्रामुख्याने दिल्लीहून येणाऱ्या विमानांना फटका बसला. दिल्लीहून येणाऱ्या सुमारे ५ विमानांना विलंब झाला. याचवेळी पुण्यातून विविध शहरांत जाणाऱ्या सुमारे ८ विमानांच्या उड्डाणाला विलंब झाला.

विमाने दुसरीकडे वळविण्यात आल्याची अथवा विलंब होत असल्याची माहिती विमान कंपन्यांकडून प्रवाशांना वेळेत देण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. विस्तारा कंपनीने समाजमाध्यमावर याबाबत घोषणा केली. परंतु, विमानतळावरील डिजिटल माहिती फलकांवर याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या, अशी तक्रार अनेक प्रवाशांनी केली. देशभरातील विमानतळांमध्ये पुणे विमानतळावर शुक्रवारी सकाळी सर्वाधिक धुके दिसून आले. यामुळे पुणे विमानतळावरील सर्वसाधारण दृश्यमानता सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी ५० मीटरवर आली होती. याचवेळी धावपट्टीची दृश्यमानता १५० मीटवर आली होती. चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त हवा आल्याने धुके निर्माण झाले. पुणे-बंगळुरू या विमानाला १२० मिनिटांचा विलंब झाला. परंतु, पुणे विमातळावरील डिजिटल फलकांवर याची माहिती देण्यात आली नव्हती. याबाबत चौकशी करण्यासाठीही तिथे कर्मचारीही उपलब्ध नव्हते. पुणे विमानतळावरील सेवा अतिशय खराब आहे.

रेल्वे सेवालाही धुक्याचा फटका

धुक्यामुळे रेल्वेसेवेला सुमारे आठ तासांचा फटका शुक्रवारी बसला. सोलापूरनजीक मोहोळ ते मलिकपेठ, दौंड ते पारेवाडी, दौंड ते श्रीगोंदा, दौंड ते केडगाव, मसूर ते कोरेगाव, सालपे ते वाल्हा या भागात लोहमार्गावर रात्री १ वाजून १० मिनिटांपासून सकाळी ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत धुके होते. त्यामुळे धुके निवळल्यानंतर आठ तासांनी रेल्वे वाहतूक सुरू झाली. याचा फटका बसल्याने अनेक गाड्यांना विलंब झाला.

Previous Post

वाकड पोलिसांनी अट्टल घरफोड्या करणाऱ्या मुंबईच्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

Next Post

तृतीयपंथीयांसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच रूग्णालयात स्वतंत्र वार्ड

Next Post
तृतीयपंथीयांसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच रूग्णालयात स्वतंत्र वार्ड

तृतीयपंथीयांसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच रूग्णालयात स्वतंत्र वार्ड

BreakingNews

महागाईचा बाप्पावरही परिणाम; गणेशमूर्तींच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांची वाढ!

HSRP नंबरप्लेटसाठी आता मुदतवाढ नाही; नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू – प्रताप सरनाईक

‘पीओपी’ गणेशमूर्ती विसर्जनाबाबत गेल्या वर्षीचीच पद्धत कायम ठेवण्याची राज्य सरकारची उच्च न्यायालयात विनंती

पावसाचा रेड-ऑरेंज अलर्ट फक्त कागदावरच? मुसळधार पावसातही रेनकोट-छत्रीसह विद्यार्थ्यांची उपस्थिती!

राज्यात मुसळधार पावसाचा कहर; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट!

कोपरी-पाचपाखाडीत मतदार पुनरिक्षण मोहिमेला वेग; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘Enumeration Form’चे वाटप

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.