Lokrakshanay
Monday, August 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबईतील बहुप्रतिक्षित काळाघोडा कला महोत्सवाला सुरुवात, २५हून अधिक ठिकाणी विविध कार्यक्रमांची रेलचेल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 31, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
मुंबईतील बहुप्रतिक्षित काळाघोडा कला महोत्सवाला सुरुवात, २५हून अधिक ठिकाणी विविध कार्यक्रमांची रेलचेल
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध काळ घोडा आर्ट फेस्टिवल सुरू झाला असून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री १० यावेळेत हा महोत्सव सुरु राहणार आहे. यादरम्यान विविध सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमांसोबतच चित्रपट, नाटक, संगीत, नृत्य तसेच लहान मुलांसाठी कार्यशाळा, विविध चर्चासत्रे अशा चारशेहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शंभरहुन अधिक कलाकृती पाहता येणार असून कलाक्षेत्रातील मान्यवर कलाकार यावेळी सहभागी होणार आहेत.

मागील २६ वर्षांपासून मुंबईतील काळा घोडा कला महोत्सव हा केवळ शहर आणि उपनगरातील कलाप्रेमींसाठीच नाहीच तर देशातील आणि परदेशातील कलप्रेमींसाठीही आकर्षणाचा विषय ठरला आहे. त्यानिमित्ताने मुंबईत कलाकारांचा आणि कलाप्रेमींचा मेळा भरतो. या नऊ दिवसांत लाखो कलाप्रेमी या महोत्सवाला भेट देतात. कलेच्या प्रदर्शनासोबतच मुंबईतील गौरवशाली ऐतिहासिक वारशाचे दर्शनही कलाप्रेमींना या निमित्ताने होते. मुंबईतील के. दुबाश मार्ग, छत्रपत्री शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय, क्रॉस मैदान, यशवंतराव चव्हाण सेंटर, डेव्हिड ससून ग्रंथालय, हॉर्निमन सर्कल गार्डन तसेच २५ हुन अधिक सभागृह आणि मोकळ्या जागांमध्ये हा महोत्सव साजरा होणार आहे. यात चित्रपट आणि नाटय महोत्सव, साहित्यिक कार्यक्रम, हेरिटेज वॉक, दृश्य कला, लोककला, वास्तूकलेवरील विशेष कार्यक्रम, स्टॅन्ड अप कॉमेडी याचसोबतच विविध कलात्मक वस्तू, दागिने, कलाकृती यांचे प्रदर्शनही यात पाहता येईल. काळा घोडा महोत्सवाच्या संकेतस्थळानुसार, हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून मोफत प्रवेश असेल. मात्र काही कार्यक्रमांसाठी संकेतस्थळावर मोफत नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. अधिक माहितीसाठी kalaghodaassociation.com या काळा घोडा महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल.

Previous Post

स्थानक परिसरातील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येवर महापालिकेचा तोडगा!

Next Post

मुंबईतील शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात; येत्या पावसाळ्यात वाहतुकीसाठी प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल

Next Post
मुंबईतील शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात; येत्या पावसाळ्यात वाहतुकीसाठी प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल

मुंबईतील शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात; येत्या पावसाळ्यात वाहतुकीसाठी प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल

BreakingNews

शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात प्रशासनाची कडक पावले; ७० जणांवर कारवाई!

गुटख्याचे पाऊच होणार इतिहासजमा; आता छोट्या डब्यातच मिळणार पान मसाला – केंद्र सरकारचा निर्णय

डी-मार्टमधून १४,९४९ रुपयांचे किराणा सामान चोरण्याचा प्रयत्न; ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

१ सप्टेंबरपासून एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य!

२०२९ पर्यंत सगळ्या लोकल मेट्रोसारख्या वातानुकूलित होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

खतांसाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही; ठाण्यात १५ ऑगस्टपासून ‘ऑनलाइन बुकिंग’ सुविधा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.