वृत्तसंस्था : भारताचा माजी क्रिकेट कर्णधार रोहित शर्माला पुण्याच्या अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले जाणार आहे. हा सन्मान २४ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभात प्रदान केला जाईल. क्रिकेटमधील योगदानाबद्दल रोहित शर्माला हा बहुमान दिला जात आहे. रोहित शर्माने भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले असून, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी२० वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. त्याने ५०८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

