Lokrakshanay
Wednesday, August 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

कॉपी मुक्त परीक्षा! सर्व परीक्षा वर्गात सीसीटीव्ही बसवण्यात येणार – राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 21, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
कॉपी मुक्त परीक्षा! सर्व परीक्षा वर्गात सीसीटीव्ही बसवण्यात येणार – राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : दहावी आणि बारावीची वार्षिक परीक्षा कार्यक्रम जाहीर झाला असून कॉपी मुक्त परीक्षा अभियान अधिक जोरकस पणे राबवण्यात येणार आहे. यासाठी विविध उपायोजना करण्यात आल्या असून सर्व परीक्षा वर्गात सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांनाही कॉपी पासून परावृत्त करण्याबाबत समुपदेशन केले गेले आहे. फेब्रुवारी/मार्च २०२६ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून १० फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान या परीक्षा घेण्यात येणार आहेत. तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( १० वी) परीक्षा दिनांक २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.परीक्षाकाळात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. या परीक्षा सीसीटीव्ही निगराणीखाली घेण्यात येणार आहेत. सप्टेंबर महिन्यात प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या जिल्हानिहाय सह विचार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक यांच्या वेळोवेळी अऑफलाइन व ऑनलाइन मीटिंग घेऊन कॉपीमुक्त परीक्षा उपक्रम राबविण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने केल्या आहेत. ७ व ८ जानेवारीला कॉपीमुक्त परीक्षा अभियान या उपक्रमांतर्गत मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यकाकक्षेतील सहा जिल्ह्यांची मुख्याध्यापक / प्राचार्य यांची ऑनलाइन सभा घेऊन विभागीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय सचिव व विभागीय सहाय्यक सचिव यांनी मार्गदर्शन केले.त्यामध्ये विद्यार्थ्यांने भयमुक्त वातावरणात परीक्षा कशी द्यावी व परीक्षा देताना काय करावे व काय करू नये याबाबत सूचना देण्यात आल्या.विभागीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्या ऑनलाइन सभा घेऊन विभागीय सचिव व विभागीय सहा, सचिव यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांकरिता गैरमार्ग शिक्षा सूची मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्या निदर्शनास आणून दिली व सदर शिक्षा सूची विद्यार्थी व पालक यांच्या देखील निदर्शनास आणण्यात यावी असे निर्देश देण्यात आले.उदाहरणार्थ विद्यार्थ्यांनी अधिकृत प्रवेश पत्र स्वतः जवळ बाळगावे व गैरमार्ग होईल असे कोणतेही साहित्य स्वतः जवळ बाळगू नये., लिहिलेले नोट्स, गाईड्स, हस्तलिखित उत्तरे, कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने वापरू नयेत, विद्यार्थ्यांनी स्वतः कॉपी करू नये व इतरांना प्रवृत्त करू नये, तसेच विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेवर आपला बैठक क्रमांक अंकात किंवा अक्षरी बरोबर लिहावा. फॉर्म नंबर एक वर स्वतःचा बैठक क्रमांकाची खात्री करून त्यासमोर उपस्थिती बाबत स्वाक्षरी करावी. कॉपी मुक्त अभियान म्हणजे विद्यार्थाना वेठीस धरणे नाही तर केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय, पुरेशे स्वच्छतागृहे, वीज पुरवठ्यासाठी इन्वर्टर किवा जनरेटरची सुविधा, परीक्षा साहित्य ठेवण्यासाठी कडेकोट सुरक्षा असलेली स्ट्रॉग रूम अनिवार्य आहे. ताण तणाव व आहार याबाबत घ्यावयाची काळजी.

Previous Post

मंत्रालयाशेजारील परिसरात इमारतींच्या उंचीवर मर्यादा!

Next Post

जेवणावर लिंबू पिळण्याचे आरोग्यदायी फायदे

Next Post
जेवणावर लिंबू पिळण्याचे आरोग्यदायी फायदे

जेवणावर लिंबू पिळण्याचे आरोग्यदायी फायदे

BreakingNews

मॉल मधील दुकानांवरही आता मराठी पाट्या सक्तीच्या; मुंबई महापालिकेचा थेट इशारा!

घराजवळ आरोग्य सेवा! नवी मुंबईतील झोपडपट्ट्या आणि नागरी भागात मोबाईल कॅन्सर व्हॅनला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईकरांची कोंडी होण्याची शक्यता? ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.