Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 19, 2026
in Uncategorized, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या
Share on FacebookShare on Whatsapp

वसई : पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार रेल्वे स्थानक एक गजबजलेले रेल्वे स्थानक आहे. गेल्या काही काळात वसई, विरार आणि नालासोपारा शहरात मुंबई, ठाणे, पालघर यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून आणि देशातील गुजरात, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि बिहारसारख्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर झाले आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असणारी कोंडी, विरार ते ठाणे, मुंबई आणि पालघर शहरांतर्गत नसणारी बस सेवा, तसेच खाजगी वाहतूक सेवांकडून आकारले जाणारे भरमसाठ भाडे यामुळे बहुतांश प्रवासी लोकलने प्रवास करणे पसंत करतात. जलद प्रवास आणि तिकिटाच्या परवडणाऱ्या किंमती यामुळे दैनंदिन हजारो प्रवासी लोकलने प्रवास करतात.

तर वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या एसी लोकलमुळे लांब पल्ल्याचा तसेच भर उन्हाळ्यात लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास काहीसा सुखकर झाला आहे. पण, वाढती गर्दी आणि एसी लोकलच्या कमी फेऱ्या यामुळे विरारहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसी लोकलने प्रवास करताना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत होता. तसेच काहींना नाईलाजाने एसी लोकलऐवजी दुसऱ्या लोकलने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जात होती. तसेच, खासदार हेमंत सावरा यांनीही ही मागणी हिवाळी अधिवेशनात लावून धरली होती. त्यामुळे प्रजासत्ताक दिनापासून पश्चिम रेल्वे मार्गावर १२ नव्या एसी लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. यात ६ लोकल फेऱ्या अप मार्गावर तर ६ लोकल फेऱ्या डाऊन मार्गावर वाढवल्या जाणार आहेत. त्यापैकी ४ एसी लोकल फेऱ्या या विरार ते चर्चगेट मार्गावर तर २ नव्या एसी लोकल भाईंदर ते चर्चगेट मार्गावर सुरू केल्या जाणार आहेत. नव्या एसी लोकलमुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

Previous Post

ठाण्यात विंटेज गाड्यांच्या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

Next Post
मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.