Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘Border 2’ मधील ‘घर कब आओगे’ गाणे प्रदर्शित! जुन्या आठवणींना उजाळा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 7, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
‘Border 2’ मधील ‘घर कब आओगे’ गाणे प्रदर्शित! जुन्या आठवणींना उजाळा
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर चित्रपट ‘बॉर्डर’च्या सिक्वेलची म्हणजेच ‘बॉर्डर २’ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच या चित्रपटातील पहिले गाणे ‘घर कब आओगे’ प्रदर्शित झाले असून या गाण्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. हे गाणे १९९७ मधील ‘संदेशे आते है’ या गाण्याचे नवे व्हर्जन असून याने पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. या नवीन गाण्याचे संगीत दिग्दर्शन मिथुन याने केले असून मनोज मुंतशीर यांनी मूळ गीताला जोड दिली आहे. विशेष म्हणजे या गाण्यात सोनू निगम, अरिजित सिंग, रूपकुमार राठोड, विशाल मिश्रा आणि दिलजीत दोसांझ यांसारख्या दिग्गज गायकांचा आवाज ऐकायला मिळत आहे. सोनू निगम आणि रूपकुमार राठोड यांच्या आवाजामुळे या गाण्याचा आत्मा कायम राहिला असल्याची भावना चाहते व्यक्त करत आहेत.

गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. एका युजरने लिहिले की, “याला म्हणतात योग्य रिमेक! सोनू निगमचा आवाज आजही जादू करतो.” तर दुसऱ्या एका चाहत्याने दिलजीत दोसांझ आणि विशाल मिश्रा यांच्या भागाचे कौतुक केले आहे. काही लोकांना मात्र मूळ गाण्याची सर या गाण्याला नसल्याचे वाटत आहे. अरिजित सिंगच्या आवाजाबाबतही चाहत्यांमध्ये संमिश्र चर्चा असून अनेकांनी “जुन्या दिवसांची आठवण झाली” असे म्हटले आहे. मूळ गाण्याचे गीत जावेद अख्तर यांनी लिहिले होते, ज्यासाठी त्यांना १९९८ मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘बॉर्डर २’ मध्ये सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुराग सिंग यांनी दिग्दर्शित केलेला ‘बॉर्डर २’ हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

Previous Post

राज्यात २८६९ नगरसेवकपदांसाठी १५,९३१ उमेदवार रिंगणात

Next Post

मिरा भाईंदरसह वसई विरारमध्ये नायलॉन मांज्याचा वापर व विक्रीवर बंदी

Next Post
मिरा भाईंदरसह वसई विरारमध्ये नायलॉन मांज्याचा वापर व विक्रीवर बंदी

मिरा भाईंदरसह वसई विरारमध्ये नायलॉन मांज्याचा वापर व विक्रीवर बंदी

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.