नवी मुंबई : कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई या भागांतून प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालक आणि प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी MMRDAतर्फे उभारण्यात येत असलेला ऐरोली–कटाई उन्नत मार्ग आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वाहतुकीसाठी कधी खुला होईल याची सर्वे आतुर्तीने वाट पाहत आहेत.
सध्या कल्याण–डोंबिवलीहून नवी मुंबईत जाण्यासाठी रस्तेमार्गे किमान दीड तासाचा कालावधी लागतो. ठाणे मार्गे प्रवास करताना वाहतूक कोंडी ही मोठी समस्या ठरते. ट्रान्स हार्बर लोकल हा एकमेव जलद पर्याय असला तरी वाढत्या प्रवासी गर्दीमुळे त्यावरही ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर Airoli-Katai Naka उन्नत मार्ग सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे.

