Lokrakshanay
Wednesday, April 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

शब्द दिल्याप्रमाणे पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले,आता रुग्णांना पंचतारांकित सेवा देण्याची जबाबदारी मात्र तुमची – मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन संपन्न

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 27, 2023
in ठाणे, ताज्या बातम्या
शब्द दिल्याप्रमाणे पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले,आता रुग्णांना पंचतारांकित सेवा देण्याची जबाबदारी मात्र तुमची – मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले आहे. आता रुग्णांना तुम्ही पंचतारांकित सेवा द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोलताना केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास आमदार श्री. प्रताप सरनाईक, माजी आमदार श्री.रवींद्र फाटक, माजी महापौर श्री. नरेश म्हस्के, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) श्री. संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) श्री. प्रशांत रोडे, उपायुक्त (आरोग्य) श्री. उमेश बिरारी आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दि. ४ जून २०२३ रोजी केलेल्या पाहणीनंतर वसतिगृहाचे रूप पूर्ण बदलून उत्तम दर्जाच्या सोयींनी युक्त असे वसतिगृह देण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांना दिले होते. त्यानुसार, निविदा प्रक्रिया पूर्ण करून, सुमारे ११ कोटी रुपये खर्च करून ९० दिवसात वसतिगृहाचे पूर्ण नवीन रूप साकारण्यात आले आहे. मुख्यमंत्री महोदयांनी वसतिगृहाचे कॅन्टीन, व्यायामशाळा आणि खोल्यांची पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

रुग्णालयातील वातावरण, स्वच्छता, इमारत यांच्यामुळे रुग्ण अर्धा बरा होतो. उरलेला अर्धा भार हा डॉक्टरांवर असतो. तुम्ही या यंत्रणेचा कणा आहात, तुम्ही उत्तम काम करून अत्युच्च उपचार करावा, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले. वसतिगृहाचे उद्घाटन करण्यापूर्वी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेचे लोकार्पण केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसूती कक्ष येथे भेट देवून या योजनेतील मातृत्व भेट मातांच्या हाती सुपूर्द केली. त्या मातांशी त्यांनी संवादही साधला. याप्रसंगी, आयुक्त श्री. बांगर यांनी दोन्ही प्रकल्पांबाबत सादरीकरण केले. तसेच, विद्यार्थी प्रतिनिधींनी पत्र रुपाने मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले.

Previous Post

दुचाकीस्वाराची नाकाबंदीसाठी तैनात असलेल्या पोलिसाला धडक

Next Post

ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवतेला ललित पाटील प्रकरणात गुन्हे शाखेने केली अटक

Next Post
ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवतेला ललित पाटील प्रकरणात गुन्हे शाखेने  केली अटक

ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवतेला ललित पाटील प्रकरणात गुन्हे शाखेने केली अटक

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.