Lokrakshanay
Saturday, June 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

५ डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झाल्यास वेतन कापणार – शिक्षण विभागाचा इशारा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 4, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
५ डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झाल्यास वेतन कापणार – शिक्षण विभागाचा इशारा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : गेल्या दोन–तीन वर्षांत शालेय शिक्षण विभागानं राबवलेल्या नव्या धोरणांमुळे शिक्षक, शाळा आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून करण्यात आला आहे. प्रशासनाला शाळा आणि शिक्षकांशी काही देणं-घेणं राहिलं नाही, अशी स्पष्ट नाराजी विविध शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे. सरकारच्या शाळाविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी ५ डिसेंबरला एकदिवसीय शाळा बंद आंदोलन जाहीर केलं आहे.

कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करून विद्यार्थ्यांना जवळच्या समूह शाळांत विलीन करण्याची राज्य सरकारकडून प्रक्रिया सुरू आहे. त्याला शिक्षक संघटनांचा विरोध आहे. पण, कमी विद्यार्थी असल्यानं शाळा बंद करावी लागत आहे, अशी शालेय शिक्षण विभागाची भूमिका आहे. दुसरीकडं शालेय शिक्षण विभागाच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांना काय अडचणींना सामोरे जावे लागते, याबाबत शिक्षकांनी वस्तुस्थिती सांगितली आहे. मुख्याध्यापक विनोदकुमार भोंग यांनी सांगितलं की, डोंगराळ आणि आदिवासी भागातील मुलांना रोज काही किलोमीटर प्रवास करून शाळेत पाठवणं अवघड आहे. वाहतूक भत्त्याचं आश्वासन कागदावरच राहीलं तर या मुलांचा शिक्षणाशी संबंध तुटेल. शिक्षक समायोजनाच्या प्रक्रियेमुळे राज्यातील तब्बल ६०० मराठी शाळांना बंद पडण्याचा धोका आहे. त्यातून सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे. शिक्षक संघटनांकडून शाळा बंद पुकारण्यात आल्यानंतर शालेय शिक्षण विभागानं त्यांना कारवाईची तंबी दिली आहे. शिक्षक संघटनांकडून जाहीर करण्यात आलेल्या शाळा बंद आंदोलनात, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता सहभागी होऊ नये, असे शिक्षण विभागानं शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे. या आवाहनानंतरदेखील आंदोलनात सहभागी झालेल्यांचा एक दिवसाचं वेतन कापला जाईल, असा इशारा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी पत्रकातून दिला आहे.

Previous Post

NO PARKING! ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवेशबंदी

Next Post

मुंबईत ८ ते ९ डिसेंबरदरम्यान पाणीकपात! महापालिकेचा निर्णय

Next Post
मुंबईत ८  ते ९ डिसेंबरदरम्यान पाणीकपात! महापालिकेचा निर्णय

मुंबईत ८ ते ९ डिसेंबरदरम्यान पाणीकपात! महापालिकेचा निर्णय

BreakingNews

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

खड्ड्यांच्या तक्रारींचे २४ तासांत निराकरण करा; महानगरपालिकेच्या अभियंत्यांना निर्देश!

हॉस्पिटलच्या मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती आता चालणार नाही! – तुकाराम मुंढे

बेस्ट संपाचा मेट्रोला मोठा लाभ; प्रवाशांचा मेट्रोकडे लक्षणीय ओढा!

पहिल्याच पावसात पोलखोल! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणीच पाणी; टर्मिनलमधील गळतीचा व्हिडिओ व्हायरल

फिफा विश्वचषकात आज पाच रंगतदार सामने; नेदरलँड्स-स्वीडन लढतीकडे सर्वांचे लक्ष!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.