Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

सोफी : १७ वर्षीय विद्यार्थ्याने बनवला AI शिक्षिका रोबोट

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 29, 2025
in ताज्या बातम्या, देश -विदेश
सोफी : १७ वर्षीय विद्यार्थ्याने बनवला AI शिक्षिका रोबोट
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा आजकाल नेहमी चर्चेत असलेला विषय झाला आहे. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात AI हा सर्वाधिक चर्चेत असलेला ट्रेंड बनला आहे. केरळ नंतर आता उत्तर प्रदेशातील एका १७ वर्षीय विद्यार्थ्याची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. या विद्यार्थ्याने सोफी नावाची AI शिक्षिका तयार केली आहे. एका मुलाखतीत त्याने हा रोबोट कसा बनवला आणि तो काय करू शकतो हे सांगितले. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांच्या बुद्धीमत्तेचे आणि कलेचे कौतुक केले जात आहे.

सोफी असे या शिक्षिकेचे नाव आहे. सोफीला कोणतेही प्रश्न विचारले तर ती त्याची अचूक उत्तरे देते. ही सर्वगुण संपन्न AI शिक्षिका आदित्य कुमार नावाच्या एका विद्यार्थ्याने तयार केली आहे. सोफी केवळ विद्यार्थ्यांना शिकवत नाही तर शाळेत सर्वांची आवडती शिक्षिका बनली आहे. ही शिक्षिका सध्या फक्त बोलत असली तरी लवकरच ती लिहायला देखील शिकणार असल्याचे आदित्य म्हणाला आहे. आदित्यने ही रोबोट शिक्षिका बनवण्यासाठी एलएलएम चिपसेटचा वापर केला आहे. ही चिपसेट मोठ्या टेक कंपन्या त्यांच्या स्मार्ट रोबोटमध्ये वापरतात असे आदित्यने सांगितले. यावेळी आदित्यने सोफीला स्वतःची ओळख करून देण्यासाठी सांगितले. तेव्हा ती म्हणाली की, “मी एक एआय शिक्षक रोबोट आहे. माझे नाव सोफी आहे आणि मला आदित्यने बनवले आहे. मी बुलंदशहरमधील शिवचरण इंटर कॉलेजमध्ये शिकवते… हो, मी विद्यार्थ्यांना चांगले शिकवू शकते, असे तिने सांगितले. सध्या या सोफीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यासोबत आदित्यच्या या कलेचे देखील कौतुक केले जात आहे. गेल्या वर्षी केरळमधील एका शाळेत अशीच एक AI रोबोट शिक्षिका तयार केली होती.

Previous Post

धक्कादायक! २६ वर्षीय MPSCच्या विद्यार्थाची गळफास घेत आत्महत्या

Next Post

नवीन वर्षापासून WhatsAppचे ‘हे’ फीचर होणार बंद!

Next Post
नवीन वर्षापासून WhatsAppचे ‘हे’ फीचर होणार बंद!

नवीन वर्षापासून WhatsAppचे ‘हे’ फीचर होणार बंद!

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.