Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

गरजूंना दिलासा देणारी ‘शिवभोजन थाळी’ बंद होणार?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 20, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
गरजूंना दिलासा देणारी ‘शिवभोजन थाळी’ बंद होणार?
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : राज्यात महाविकास आघाडीच्या काळात सुरू झालेली शिवभोजन थाळी शेवटच्या घटका मोजत आहे. सध्याच्या सरकारकडून ही योजना चालविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही योजना गुंडाळणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पहिल्या टप्प्यात अनेक केंद्रांवर थाळीची संख्या कमी करण्यात आली होती. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून केंद्र चालकांना अनुदान मिळालेले नाही. कोरोनाच्या काळात या थाळीचा अनेक गरजूंना मोठा दिलासा मिळाला. तत्कालीन महाविकास आघाडीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी पाच रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली होती. त्यानंतर तिची किंमत वाढवून १० रुपये करण्यात आली. दरम्यान, त्यातील काही अनुदान हे शासनाकडून देण्यात येत होते. शहरात सद्यस्थितीत १४ केंद्रे आहेत; मात्र त्यापैकी अनेक केंद्र चालकांना ही योजना परवडत नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

दरम्यान, अन्नपुरवठा विभागाच्या माध्यमातून या केंद्राचे नियंत्रण असल्याने पहिल्यांदा या केंद्र चालकांना वेळोवेळी बिले अदा केली जात होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून या योजनांकडे दुर्लक्ष होत आहे. थाळ्यांची संख्या कमी करणे, अनुदान न देणे, केंद्रचालकांच्या समस्या ऐकू न घेणे अशा विविध कारणांमुळे ही योजना पुढे चालवायची की नाही, अशा मनःस्थितीमध्ये केंद्रचालक सापडले आहेत.

Previous Post

गुटखा विक्रीवर लागू होणार ‘मोका’! – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ

Next Post

डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो येणार मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Next Post
डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो येणार मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो येणार मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.