Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

कोथरुडमधील फसवणूकप्रकरणी भोंदूबाबासह तिघांना ठोकल्या बेड्या

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 8, 2025
in गुन्हेगारी, पुणे
कोथरुडमधील फसवणूकप्रकरणी भोंदूबाबासह तिघांना ठोकल्या बेड्या
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : दुर्धर विकाराने ग्रासलेल्या मुलींचे आजारपण दूर करण्याच्या आमिषाने कोथरूडमधील दाम्पत्याची १४ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकर उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने भोंदू बाबासह तिघांना नाशिक शहरातून अटक केली आहे. आरोपींना १४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी वेदिका कुणाल पंढरपूरकर, कुणाल वैजनाथ पंढरपूरकर (दोघे रा. २२, कैलासदीप, गल्ली क्रमांक ११, महात्मा सोसायटी, कोथरूड), दीपक जनार्दन खडके (जय शंकर फार्म हाऊस, नाशिक) यांना अटक केली आहे. याप्रकरणी वेदिकाची आई आणि भावावर गुन्हा दाखल आहे. याबाबत दीपक पुंडलिकराव डोळस यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक डोळस हे मूळचे पुण्यातील आहेत. ते इंग्लडमधील आयटी कंपनीत नोकरीस होते. त्यांची एक मुलगी मतिमंद आहे. दुसरी मुलगी दुर्धर विकाराने ग्रस्त आहे. मुलींवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी ते २०१० मध्ये भारतात परतले. डोळस दाम्पत्य कोथरूडमधील भजनी मंडळात जायचे. तेथे एकामार्फत दीपक खडसे याच्याशी ओळख झाली. खडसेने डोळस यांची आरोपी वेदिका पंढरपूरकर हिच्याशी ओळख करुन दिली. ‘वेदिका ही एका बाबांची लेक आहे. तिच्या अंगात दैवी संचार होतो,’ असे खडके याने तक्रारदारांना सांगितले. मोठी रक्कम दिल्यानंतरही मुलींच्या आरोग्यात सुधारणा झाली नाही. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे अर्ज दिला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबर व त्यांच्या पथकाने तिघांना नाशिक परिसरातून अटक केली आहे.

Previous Post

बिग बॉस १९: सलमान खानने दाखवला फरहाना भट्टला बाहेरचा रस्ता

Next Post

शिवाजी पार्कच्या मैदानातील मातीवर तोडगा काढण्यासाठी खेळाडूंचे पालिका प्रशासनाला पत्र

Next Post
शिवाजी पार्कच्या मैदानातील मातीवर तोडगा काढण्यासाठी खेळाडूंचे पालिका प्रशासनाला पत्र

शिवाजी पार्कच्या मैदानातील मातीवर तोडगा काढण्यासाठी खेळाडूंचे पालिका प्रशासनाला पत्र

BreakingNews

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

१ मेपासून एसटी बसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ने स्वागत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.