Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

नवी मुंबई विमानतळावर अपोलो रुग्णालायाकडून २४ तास वैद्यकीय सेवा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 6, 2025
in Uncategorized, ताज्या बातम्या, नवी मुंबई
नवी मुंबई विमानतळावर अपोलो रुग्णालायाकडून २४ तास वैद्यकीय सेवा
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (एनएमआयए) भव्य उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाल्यानंतर आता प्रवासी सुरक्षा आणि आरोग्य व्यवस्थेची तयारी वेगाने सुरू आहे. विमानतळावरील सुरक्षेसाठी ७ किलोमीटर अंतरावरील अग्निशमन यंत्रणेसोबत आपत्तीवेळी तातडीच्या मदतीसाठी एनएमआयएएलने केलेला करार आणि आता अपोलो रुग्णालयासोबत आरोग्यसेवेचा करार या दोन्ही उपक्रमांमुळे विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या जीवित सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

विमानतळाचे ऑपरेटर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. (एनएमआयएएल) आणि अपोलो रुग्णालय यांच्यात नुकताच सामंजस्य करार (एमओयू) झाला असून, त्याअंतर्गत विमानतळावर २४ तास कार्यरत राहणारे अत्याधुनिक वैद्यकीय केंद्र सुरू होणार आहे.विमानतळाच्या टर्मिनल १ येथे स्थापन होणारे हे वैद्यकीय केंद्र कामकाज सुरू होण्यापूर्वीच कार्यान्वित होईल. या केंद्रामध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवा, अपघात आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक सर्व सुविधा असतील. प्रवासी आणि कर्मचारी यांना तत्काळ आरोग्य सहाय्य मिळावे यासाठी येथे तीन डॉक्टर, आठ नर्सिंग स्टाफ आणि दोन ड्रायव्हर्स अशा प्रशिक्षित टीमची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व वैद्यकीय कर्मचारी अॅडव्हान्स्ड कार्डिओव्हस्क्युलर लाइफ सपोर्ट (ACLS) प्रमाणित असतील.प्रवाशांच्या आपत्कालीन उपचारांसाठी विमानतळावर दोन ऑन-साइट अतिदक्षता वैद्यकीय सेवेची उपकरणाने सज्ज असलेली रुग्णवाहिका उपलब्ध असेल. तसेच, ६५ ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर्स (AEDs) टर्मिनल परिसरात धोरणात्मक ठिकाणी बसविण्यात आले आहेत, जे हृदयविकाराच्या झटक्याच्या प्रसंगी त्वरित उपचारासाठी उपयुक्त ठरतील.

Previous Post

सलमान खान अडचणीत; पान मसाल्याच्या जाहिरातीसंदर्भात न्यायालयाकडून नोटीस!

Next Post

“मी पोलीस आहे..” कुख्यात बनावट पोलीस फसवणूकबाज गजाआड!

Next Post
“मी पोलीस आहे..” कुख्यात बनावट पोलीस फसवणूकबाज गजाआड!

“मी पोलीस आहे..” कुख्यात बनावट पोलीस फसवणूकबाज गजाआड!

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.