Lokrakshanay
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मुंब्रा कौसा परिसरात चालत्या स्कूल बसने घेतला पेट!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 5, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
मुंब्रा कौसा परिसरात चालत्या स्कूल बसने घेतला पेट!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मुंब्रा-कौसा येथील सिम्बॉयसिस शाळेच्या बसने अचानक पेट घेतल्याची गंभीर घटना मंगळवारी दुपारी मुंब्रा बायपास मार्गावर असताना घडली. सुदैवाने विद्यार्थ्यांना सोडून आल्यावर हा सर्व प्रकार घडल्याने मोठी जिवीत हानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन आग विझवण्यात आली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून या घटनेनंतर विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंब्रा कौसा येथील सिम्बॉयसिस शाळेची बस विद्यार्थ्याना सोडुन परतीच्या मार्गावर असताना अचानक शॉर्टसर्किट झाल्याने बसला आग लागली. आग लागताच चालक आणि क्लिनर (मदतनीस) सुदैवाने बसच्या बाहेर पडल्याने बचावले आहेत. बसमधील विद्यार्थ्यांना बसमधून उतरवले आणि काही अंतरावर जाताच स्कूल बस पेटली. कौसा येथील सिंबोसिस शाळेतील जवळपास ३५ ते ४० विध्यार्थीना शाळेच्या बसमधून घरी सोडण्यात आले. त्यानंतर रिकामी बस ठाणे-पनवेल मार्गावरील मुंब्रा देवी जवळ आली असता दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला.

बसमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली असल्याची माहिती कळताच ड्रायव्हर दत्तात्रय पाटील व कंडक्टरने बस बाजूला लावली आणि तत्काळ बस बाहेर पडले. बघता बघता स्कूल बसचा जोरदार भडका उडाला. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा अग्निशमन दलाचे अग्निशमन दलाचे जवान फायर वाहनसह २ रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये दोन व्यक्ती प्रवास करत होते व गाडीला आग लागताच गाडी चालक व गाडी क्लिनर सुरक्षेच्या कारणास्तव गाडी बाहेर आले होते अशी माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती अधिकाऱ्यांनी दिली. सिंबोसिस शाळेच्या बसला आग लागली असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे कर्मचारी रुपेश शेळके यांनी अग्निशमन पथकाला दिली. त्यानुसार मुंब्रा अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या १२ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आग पूर्णपणे विझवण्यात आली. दरम्यान, अवघ्या अर्ध्या तासातच बसचा कोळसा झाला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.

Previous Post

मुंबईत मानवतेला काळिमा; १ महिन्याचे बाळ कचऱ्यात!

Next Post

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील विधी शिक्षणाचे केंद्र बनेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील विधी शिक्षणाचे केंद्र बनेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील विधी शिक्षणाचे केंद्र बनेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.