वृत्तसंस्था : अभिनेता सनी देओलनं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता ‘गदर २’च्या जबरदस्त यशानंतर, त्याच्या कारकिर्दीत लक्षणीय बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता त्याच्याकडे अनेक चित्रपट आहेत. यावर्षी त्याचा ‘जाट’ चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट अनेकांना आवडला होता. दरम्यान आज १९ ऑक्टोबर रोजी सनी पाजी त्याचा ६८वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी सनी देओलनं त्याचा आगामी चित्रपट ‘गबरू’ची घोषणा केली आहे. अभिनेत्यानं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केलं आहे.
याशिवाय त्यानं एक्सवर देखील एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यानं लिहिलं, ‘शक्ती ही तुम्ही दाखवत नाही, जे तुम्ही करता ती असते! तुमच्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे आभार, वाट पाहणाऱ्या तुमच्या सर्वांसाठी येथे काहीतरी आहे, ‘गबरू’ चित्रपटगृहात १३ मार्च २०२६. धैर्य, विवेक आणि करुणेची कहाणी. माझ्या मनापासून…जगापर्यंत! आता सनीच्या या पोस्टनंतर अनेकजण खुश झाले आहेत. दरम्यान या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन सनीला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आता आपल्या वाढदिवसाच्या प्रसंगी सनीनं आपल्या चाहत्यांना एक जबरदस्त गिफ्ट दिलं आहे. दरम्यान अभिनेत्यानं सोशल मीडियावर या चित्रपटाचे मोशन पोस्टरसह त्याची रिलीज तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट शशांक उदापूरकर हे दिग्दर्शित करत आहे, ज्यांनी यापूर्वी ‘छत्रपती शिवाजी’ आणि ‘बदलापूर बॉईज’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.’गबरू’ चित्रपटाचे पोस्टर खूपच धमाकेदार आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना भावनिक कहाणी पाहायला मिळणार आहे, असं चित्रपटाच्या पोस्टरवरून वाटते.’ गबरू’ हा चित्रपट १३ मार्च २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान येणाऱ्या काळात, सनी देओल ‘गबरू’ व्यतिरिक्त ‘रामायणम’, ‘बॉर्डर २’ आणि ‘जाट २’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

