मुंबई : बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी येत्या ९ नोव्हेंबर २०२५ रोजी बंजारा समाजाच्या वतीने शिवाजी पार्कवर विशाल मोर्चा धडकणार आहे. या मोर्चात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे चिरंजीव निरंजन नाईक हे देखील सहभागी होणार आहेत ,अशी माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य सरकारने १ लाख ३४ हजार तरूणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीवर घेतले. होते. आजमितीला त्यातील ७५ टक्के तरूणांचे प्रशिक्षण संपलेले आहे. आता त्यांना एक रूपयाही मिळत नाही. या तरूणांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला होता. या मोर्चाला संबोधित केल्यानंतर काही युवतींनी हरिभाऊ राठोड यांचे औक्षण केले. तसेच, हरिभाऊ राठोड यांनी दिवे प्रज्वलित करून बंजारा भाषेत गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हरिभाऊ बोलत होते. ९ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क दादर या ठिकाणी दीपावली मिलन महामेळावा होणार असून जय सेवालालचा नारा देत पांढरं वादळ मुंबईत धडकणार आहे,याची माहिती दिली.

