Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

उल्हासनगरच्या तस्करांकडून ८४ लाखाचा गांजा जप्त

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 16, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
उल्हासनगरच्या तस्करांकडून ८४ लाखाचा गांजा जप्त
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : माणकोली उड्डाण पुलाच्या भिवंडी हद्दीत नारपोली पोलीस बुधवारी रात्री गस्त घालत होते. यावेळी काही संशयास्पद वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांनी दुचाकीवरून सुसाट वेगाने जात असलेल्या दोन तरूणांना रोखले. या तरूणांच्या दुचाकीतील साधन पेटीची (डिकी) तपासणी केली असता, पोलिसांना त्यामध्ये १० हजार ग्रॅम वजनाचा ८४ लाख ४७ हजार रूपये किमतीचा गांजा आढळला. पोलिसांनी तो जप्त केला. दोघांना ताब्यात घेतले.

गांजा तस्कर आता गांजाची नेआण करण्यासाठी दुचाकींचा वापर करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यासाठी रात्रीची वेळ निवडतात हेही पोलिसांना समजले. आकाश रमेश गुप्ता (२४, रा. सुभाषनगर चाळ, हनुमान मंदिर, उल्हासनगर), हर्ष रवी ब्राह्मणे (२६, रा. पंजाबी काॅलनी, सेक्टर तीन, गुरुनानक सोसायटी, उल्हासनगर) अशी गांजा तस्करांची नावे आहेत. नारपोली पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी कायद्याने या दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात आंध्रप्रदेश, विशाखापट्टणम, महाराष्ट्राच्या विविध भागात गांजाची तस्करी करणाऱ्या १७ जणांच्या एका आंतरराज्य टोळीला कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या पुढाकाराने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशावरून मोक्का लावला. गांजाची तस्करी सतरा जणांना एकावेळी मोक्का लावण्याची राज्यभरातील ही मोठी घटना आहे.

Previous Post

नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया खाडीत सोडण्याचा प्रशासनाचा निर्णय

Next Post

दिवाळी खरेदीचा वाहतुक व्यवस्थेवर परिणाम; कोर्टनाका, टेंभीनाका परिसरात वाहतुक कोंडी

Next Post
दिवाळी खरेदीचा वाहतुक व्यवस्थेवर परिणाम; कोर्टनाका, टेंभीनाका परिसरात वाहतुक कोंडी

दिवाळी खरेदीचा वाहतुक व्यवस्थेवर परिणाम; कोर्टनाका, टेंभीनाका परिसरात वाहतुक कोंडी

BreakingNews

अर्थमंत्र्यांच्या ‘त्या’ आश्वासनाने व्यापाऱ्यांचा युटर्न; २ ऑक्टोबरचा ‘नो UPI डे’ रद्द!

शुभमन गिलचा विश्वविक्रमांचा धडाका! २२३ धावांच्या वादळी खेळीने भारताचा विक्रमी विजय

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.