Lokrakshanay
Wednesday, April 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

BMCचा कडक निर्णय! मुंबईत विनापरवाना फटाकेविक्रीवर बंदी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 11, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
BMCचा कडक निर्णय! मुंबईत विनापरवाना फटाकेविक्रीवर बंदी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : आठवड्याभरावर आलेल्या दिवाळीमुळे मुंबईतील घराघरात सध्या जय्यत तयारी सुरू आहे. साफसफाई, फराळ, आकर्षक कंदील आणि पणत्यांची खरेदीही सुरू झाली आहे. मात्र, दिवाळी म्हटलं की सर्वांना आठवणारे फटाके फोडण्यापूर्वी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता मुंबईच्या रस्त्यांवर फटाके विक्री करण्यावर बंदी घालण्याचा कडक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विनापरवाना होणाऱ्या फटाकेविक्रीवर पूर्णपणे ‘बॅन’ लावण्यात आला आहे. मुंबई शहराची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी महानगरपालिकेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे, फुलबाजी, भुईचक्र, अनार किंवा बॉम्बची खरेदी आता अधिकृत ठिकाणीच करावी लागणार आहे.

दिवाळी तोंडावर असताना मुंबई महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांवर आणि पदपथांवर होणाऱ्या अवैध फटाकेविक्रीविरोधात आता कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील सुरक्षा आणि नियमांचे पालन व्हावे, यासाठी पालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. अवैध आणि धोकादायक विक्री थांबवण्यासाठी पालिकेने १५ ऑक्टोबरपासून ते दिवाळी संपेपर्यंत दररोज विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्यांवर फटाके विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, एवढेच नव्हे तर त्यांचा मालही जप्त केला जाईल. या मोहिमेत पालिकेकडून विशिष्ट ठिकाणी विशेष लक्ष दिले जाईल. भुयारी मार्गात आवाज आणि धूर करणाऱ्या फटाकेविक्रेत्यांवर पालिकेचे विशेष लक्ष असणार आहे. केवळ अवैध विक्रेत्यांवरच नव्हे, तर अधिकृत विक्रेत्यांनाही त्यांच्या परवान्यातील मर्यादेपेक्षा अतिरिक्त साठा ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या वर्षी या कारवाईत २५० किलो फटाके जप्त करण्यात आले होते. या वर्षी अंधेरी, दादर आणि कुर्ला यांसारख्या भागांमध्ये सर्वाधिक अनधिकृत विक्री सुरू असल्याचे दिसून आले आहे. या भागांना चाप लावण्यासाठी कठोर कारवाईचे संकेत पालिकेने दिले आहेत.

Previous Post

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: पॉड टॅक्सी थेट रेल्वे स्थानकाला जोडणार

Next Post

मेलोनी सरकारचा कठोर कायदा, आता बुरखा घालण्यास बंदी!

Next Post
मेलोनी सरकारचा कठोर कायदा, आता बुरखा घालण्यास बंदी!

मेलोनी सरकारचा कठोर कायदा, आता बुरखा घालण्यास बंदी!

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.