मुंबई : लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये अंजलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती आता नव्या मालिकेत दिसणार असून न्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमो पाहून फॅन्स हैराण झाले आहेत.
इत्ती सी खुशी या मालिकेत दिसणार आहे. मालिकेत दिवेकर परिवाराचा आनंद, संघर्ष आणि नात्यांची गुंफण सुंदर चित्रण केले जाणार आहे. आता या कहानीमध्ये नवे वळण आले आहे. अन्विता (सुम्बुल तौकीर खान)ची ऑनस्क्रीन आई हेतलची भूमिका नेहा साकारणार आहे. हेतलची एन्ट्री नवा ड्रामा आणि भरपूर मनोरंजन मालिकेत घेऊन येईल. ती बडबडी, बिनधास्त, सर्वांची काळजी घेणारी आहे. आपला स्टायलिश, ग्लॅमरस अंदाज दाखवण्याची संधी ती कधीच सोडत नाही. पण या सर्वांमागे अशी एक स्त्री लपली आहे, जिचे चित्रपण मालिकेत पाहायला मिळणार आहे. ती खूप प्रेमळ आहे.