Lokrakshanay
Tuesday, April 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पहिल्याच दिवशी दैनंदिन प्रवासी संख्येचा विक्रम; ‘मेट्रो ३’ची दैनंदिन प्रवासी संख्या एक लाखा पार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 10, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
पहिल्याच दिवशी दैनंदिन प्रवासी संख्येचा विक्रम; ‘मेट्रो ३’ची दैनंदिन प्रवासी संख्या एक लाखा पार
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : ‘कुलावा – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो ३’ मार्गिका गुरुवारपासून पूर्ण क्षमतेने धावू लागली असून गुरुवारी सकाळी ५.५५ वाजता कफ परेडवरून पहिली मेट्रो गाडी सुटली. पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने मेट्रो धावणार असल्याने आणि आरे – कफ परेड दरम्यान मेट्रो प्रवास सुरू होणार असल्याने मुंबईकर उत्सुक होते. दिवसभर आरे – कफ परेडदरम्यानच्या प्रत्येक स्थानकांवर मोठी गर्दी होते. पूर्ण क्षमतेने मेट्रो धावू लागताच पहिल्या दिवशी मेट्रो ३ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येने विक्रम केला. मेट्रो ३ वरील दैनंदिन प्रवासी संख्येने गुरुवारी पहिल्यांदाच एक लाखांचा टप्पा पार केला. सायंकाळी ७ पर्यंत या मार्गिकेवरून तब्बल एक लाख १८ हजार २८६ प्रवाशांनी प्रवास केला. ही आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन प्रवासी संख्या आहे. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेची बांधणी केली असून या मार्गिकेचे संचलनही एमएमआरसीकडूनच केले जाते. या मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये, तर बीकेसी – आचार्य अत्रे चौक टप्पा मे २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. या मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक – कफ परेड या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असून मेट्रो ३ गुरुवारी सकाळपासून पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे.

सकाळी ५.५५ वाजता कफ परेड आणि आरे मेट्रो स्थानकांवरून पहिली गाडी सोडण्यात आली. गुरुवारी पहिल्यांदाच आरे – कफ परेड दरम्यान मेट्रो धावली. भुयारी मेट्रो मार्गाने पहिल्यांदाच गिरगाव, काळबादेवी, महालक्ष्मी, चर्चगेट, सीएसएमटी, विधान भवन, कफ परेड येथे जाता येत असल्याने मुंबईकरांमध्ये उत्सुकता होती. त्यामुळे सकाळी गर्दीच्या वेळी अनेक मेट्रो स्थानकांवर बऱ्यापैकी गर्दी होती. दुपारी गर्दी काहीशी कमी झाली. मात्र कार्यालये सुटल्यानंतर सायंकाळी ६ पासून पुन्हा स्थानकांवर गर्दी होऊ लागली. पहिल्या दिवशी या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळाला. मेट्रो ३ मधून गुरुवारी सायंकाळी ६ पर्यंत ९७ हजार ८४६ प्रवाशांनी प्रवास केला. कार्यालये सुटल्यानंतर, सायंकाळी ६ नंतर मेट्रो प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली, त्यामुळेच तासाभरातच प्रवासी संख्या थेट २१ हजारांनी वाढली. सायंकाळी ७ पर्यंत एक लाख १८ हजार २८६ प्रवाशांनी प्रवास केला. ही आजपर्यंतची सर्वाधिक दैनंदिन संख्या आहे.

पहिला टप्पा सुरू झाला तेव्हा २२ हजारादरम्यान दैनंदिन प्रवासी संख्या होती. तर दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या ७० हजारावर पोहोचली होती. आता आरे – कफ परेड दरम्यान संपूर्ण मार्गिका सेवेत दाखल झाल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रवासी संख्या गुरुवारी सायंकाळी ७ पर्यंत १ लाख १८ हजार २८६ वर पोहोचली होती आणि मेट्रो सेवा रात्री १०.३० पर्यंत सुरू राहणार असल्याने पुढील साडेतीन तासांत प्रवासी संख्या दीड लाखांच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे.

Previous Post

‘तारक मेहता’ची अंजली नव्या रूपात, प्रेक्षक झाले हैराण

Next Post

जाहिरातबाजी करून मध्य रेल्वेची वर्षात ८.३८ कोटींची कमाई

Next Post
जाहिरातबाजी करून मध्य रेल्वेची वर्षात ८.३८ कोटींची कमाई

जाहिरातबाजी करून मध्य रेल्वेची वर्षात ८.३८ कोटींची कमाई

BreakingNews

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.