Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

“नवी मुंबई विमानतळाला मोदींचे नाव द्या”, दि.बा.पाटील यांच्या नावाचा अदानींचा विरोध

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 9, 2025
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
“नवी मुंबई विमानतळाला मोदींचे नाव द्या”, दि.बा.पाटील यांच्या नावाचा अदानींचा विरोध
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवारी नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबरच हे विमानतळ उभारणाऱ्या कंपनीचे सर्वेसर्वा उद्योजक गौतम अदानींसहीत अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र या सोहळ्यामध्ये कुठेही दि. बा. पाटील यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. स्थानिकांनी या विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. तसा प्रस्तावही सरकारकडून केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे. मात्र बुधवारच्या लोकार्पण सोहळ्यात दि. बा. पाटलांच्या नावाचा कुठेही उल्लेख करण्यात आला नाही किंवा मोदींनीही त्यांच्या भाषणात अशी काही घोषणा केली नाही. त्यामुळेच आता नावावरुन संभ्रम कायम असतानाच एका खासदाराने या विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्यास गौतम अदानींचा विरोध असून नरेंद्र मोदी अंतरराष्ट्रीय विमानतळ असं या विमानतळाला नाव देण्यासाठी अदानी आग्रही असल्याचा दावा केला आहे.

“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील महत्त्वाचा प्रकल्प आहे. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आम्ही उद्धव ठाकरेंच्या काळात केंद्राकडे दिला. प्रधानमंत्र्यांनी काल अर्धवट काम झालेल्या विमानतळाचं उद्घाटन केलं. दि. बा. पाटलांच्या नावाला भाजपचा विरोध आहे. गौतम अदानी यांचा या नावाला विरोध आहे,” असा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांनी केला आहे. “नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव द्यावे अशी भाजपअंतर्गत चर्चा, सूचना, मागणी आहे,” असा दावाही राऊतांनी केला आहे. “जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असलेल्या वल्लभभाई पटेल स्टेडियमला मोदींचं नाव दिले आहे. मोदींच्या नावावर एकमत झालं. नाव जाहीर न करण्यामागे भाजपची भूमिका आहे. नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावासाठी अदानी यांचा आग्रह आहे,” असंही राऊतांनी म्हटलं आहे.

 

Previous Post

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रिंकू सिंगला ‘इतक्या’ कोटींच्या खंडणीची धमकी

Next Post

‘तारक मेहता’ची अंजली नव्या रूपात, प्रेक्षक झाले हैराण

Next Post
‘तारक मेहता’ची अंजली नव्या रूपात, प्रेक्षक झाले हैराण

'तारक मेहता'ची अंजली नव्या रूपात, प्रेक्षक झाले हैराण

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.