Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

धोकादायक वाहतूक करणाऱ्या २०५ बस, व्हॅन चालकांकडून साडेसात लाखांचा दंड वसूल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 29, 2025
in गुन्हेगारी, पुणे
धोकादायक वाहतूक करणाऱ्या २०५ बस, व्हॅन चालकांकडून साडेसात लाखांचा दंड वसूल
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : विद्यार्थ्यांची अवैध आणि धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या बस, इको व्हॅन, रिक्षाचालकांवर पिंपरी-चिंचवड पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईचा दंडुका उगारला. विशेष मोहिमेंतर्गत शहरातील ३२७ वाहनांची तपासणी करून धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या २०५ बस, रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून सात लाख ६९ हजार ७५० रुपये दंड वसूल करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शहरात शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बस, व्हॅन, रिक्षा धोकादायक पद्धतीने वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. काही बसचालक नियमांचे आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या सूचनांचे पालन करत नाहीत. काही वेळा वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसविले जातात. धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या वाहतुकीबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. ‘नागरिकांच्या तक्रारींनंतर वाहतूक आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या चार वायुवेग पथकांमार्फत तपासणी करण्यात आली. पिंपरी, भोसरी, चाकण, वाकड, निगडी आणि हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दींमध्ये कारवाई करण्यात आली. एकूण १७० बस आणि १५७ व्हॅन आणि रिक्षांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी शालेय विद्यार्थ्यांची अवैध आणि धोकादायक पद्धतीने ने-आण करणाऱ्या ७० बस आणि १२८ व्हॅन, रिक्षांवर कारवाई करण्यात आली. चालकांकडून सात लाख ६९ हजार ७५० रुपये दंड वसूल केला गेला,’ असे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी सांगितले.

Previous Post

वरळी दुग्धशाळेच्या ६.४० हेक्टर जागेवर लवकरच बनणार मिनी बीकेसी

Next Post

श्रीमंत तिरुपतीला महाराष्ट्र सरकारकडून कोट्यावधीच्या भूखंडाचे भूदान

Next Post
श्रीमंत तिरुपतीला महाराष्ट्र सरकारकडून कोट्यावधीच्या भूखंडाचे भूदान

श्रीमंत तिरुपतीला महाराष्ट्र सरकारकडून कोट्यावधीच्या भूखंडाचे भूदान

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.