Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मध्य रेल्वेच्या ४६६ स्थानकात प्रथम क्रमांक; स्वच्छतेत ठरले ठाणे रेल्वे स्थानक बेस्ट

मध्य रेल्वेच्या ४६६ स्थानकांत ठाणे स्थानकाला सर्वांत स्वच्छ स्थानक म्हणून प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 28, 2023
in ठाणे, ताज्या बातम्या
मध्य रेल्वेच्या ४६६ स्थानकात प्रथम क्रमांक; स्वच्छतेत ठरले ठाणे रेल्वे स्थानक बेस्ट
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून केला जात असताना स्थानक स्वच्छ व सुंदर राखण्याचा प्रयत्न केला आहे. याची दखल मध्य रेल्वेने घेतली असून मध्य रेल्वेच्या पाच क्षेत्रीय ४६६ स्थानकांच्या पाहणीत ठाणे स्थानकाला सर्वांत स्वच्छ स्थानक म्हणून प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकांत ठाणे स्थानकाची गणना होते. दरदिवशी येथे सुमारे साडेसात लाख प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे स्थानक परिसरातील स्वच्छता ही तितकीच महत्त्वाची आहे. एकूण १० फलाट असणाऱ्या स्थानकात लोकल ट्रेनबरोबर बहुतांश मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या थांबतात. प्रवासादरम्यान प्रवाशांकडून फेकला जाणारा कचरा अस्ताव्यस्त पडणार नाही याची खबरदारी ठाणे रेल्वे व्यवस्थापक केशव तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेचे स्वच्छता कर्मचारी घेतात. ठाणे स्थानकात दिवसभराच्या तीन पाळीमध्ये स्वच्छता कर्मचारी काम करतात. दिवसाला सुमारे दोन टन कचरा साफ केला जातो.

मध्य रेल्वेने मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या क्षेत्रीय स्थानकांत कार्मिक, इलेक्ट्रिक, मेडिकल, स्वच्छता, सुरक्षा, गार्डन इत्यादीचे सर्वेक्षण केले. यामध्ये ठाणे स्थानकाला स्वच्छतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. स्वच्छता ही एक निरंतर प्रक्रिया आहे. रेल्वे स्थानक व परिसर स्वच्छ ठेवणे ही रेल्वे प्रशासनासोबत प्रवाशांचीही जबाबदारी आहे. प्रत्येक प्रवाशाने स्वच्छता राखण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, ही विनंती. – प्रवीण पाटील,वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी

Previous Post

मातृभूमीविषयी प्रेम आणि संस्कृतीविषयी आदर महत्त्वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

कळवा रुग्णालयातील प्रकार; मुलीच्या शरीरात इंजेक्शनची सुई, १६ दिवस होऊनही लक्ष देण्यास डॉक्टरांना वेळ नाही

Next Post
कळवा रुग्णालयातील प्रकार; मुलीच्या शरीरात इंजेक्शनची सुई, १६ दिवस होऊनही लक्ष देण्यास डॉक्टरांना वेळ नाही

कळवा रुग्णालयातील प्रकार; मुलीच्या शरीरात इंजेक्शनची सुई, १६ दिवस होऊनही लक्ष देण्यास डॉक्टरांना वेळ नाही

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.