Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

एपीएमसी मार्केटमध्ये गुटखा विक्रेत्यावर अन्न-औषध प्रशासन व पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन जण ताब्यात

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 22, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
एपीएमसी मार्केटमध्ये गुटखा विक्रेत्यावर अन्न-औषध प्रशासन व पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन जण ताब्यात
Share on FacebookShare on Whatsapp

नवीमुंबई : मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केट परिसरात गुटखा विक्रीचा अवैध व्यापार पुन्हा एकदा उघड झाला आहे. अन्न व औषध प्रशासन आणि एपीएमसी पोलिसांनी १७ सप्टेंबरला संयुक्त छापा टाकून गुटखा जप्त केला. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. बाजार आवारातील अनेक पानटपऱ्यांवर गुटखा व इतर अमली पदार्थ खुलेआम विकले जात असल्याची तक्रार बाजार घटकांकडून वारंवार होत आहे. यापूर्वीही अशा छापा मोहिमा राबवण्यात आल्या; मात्र काही दिवसांतच टपऱ्या पुन्हा सुरू होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सुमारे १३० पान टपऱ्यांपैकी बहुसंख्य ठिकाणी गुटखा विक्री सुरू असल्याचे आरोप बाजार घटकांकडून केले जात आहेत. या धंद्यातून दर महिन्याला लाखोंची उलाढाल होत असून, काही स्थानिक व्यक्ती आणि अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचेही बाजारात बोलले जाते. या कारवाईत दोन टपऱ्यांमधून किमान ५ किलो गुटखा जप्त करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

बाजार आवारात वास्तव्यास असलेले काही कामगारही या विक्रीत सहभागी असल्याचे स्पष्ट झाले असून, “नशामुक्त बाजार” हा उपक्रम अपयशी ठरत असल्याची टीका बाजार घटकांकडून होत आहे. बाजार घटकांच्या म्हणण्यानुसार, अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी केवळ कारवाई न करता नियमित गस्त आणि पानटपऱ्यांच्या मूळ मालकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा गुटखा माफियांचे जाळे आणखी मजबूत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Previous Post

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) बाबत ठाणे पोलिसांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना

Next Post

माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.