Lokrakshanay
Wednesday, August 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

गुन्हा करण्यासाठी आलेल्या तरूणाला अटक, कल्याण गुन्हे शाखेची कामगिरी

गंभीर गुन्हा करण्यासाठी आलेल्या तरूणाला उल्हासनगरमध्ये अटक करण्यात आली आहे. कल्याण गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे. दुर्गेशकुमार कैलास वारे असं या तरुणाचं नाव आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 23, 2023
in ठाणे, ताज्या बातम्या
गुन्हा करण्यासाठी आलेल्या तरूणाला अटक, कल्याण गुन्हे शाखेची कामगिरी
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस बाळगून उल्हासनगर येथील शांतीनगर भागातील जगदंबा मंदिर येथे गंभीर गुन्हा करण्यासाठी आलेल्या एका तरूणाला कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून अटक केली. दुर्गेशकुमार कैलास वारे (२२) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव असून तो म्हारळ गावातील रहिवासी आहे. कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना उल्हासनगरमधील शांतीनगर इथे असलेल्या जगदंबा माता मंदिराजवळ एक इसम शस्त्र घेऊन येऊन गंभीर गुन्हा करण्यासाठी येणार आहे, अशी गुप्त माहिती मिळाली होती. शनिवारी दुपारी वरिष्ठ निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इसम येणाऱ्या ठिकाणी हवालदार प्रशांत वानखेडे, अनुप कामत, विश्वास माने, गोरख शेकडे, बापूराव जाधव यांनी सापळा लावला. ठरल्या वेळेत एक इसम शांतीनगर भागात दुपारच्या वेळेत आला. तो त्या भागात येऊन घुटमळू लागल्याने हवालदार कामत यांनी त्या इसमाला या भागात काय करतो, अशी विचारणा केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

तेथून तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. हवालदार कामत यांनी इशारा करताच पोलिसांनी त्या इसमाला घेरून ताब्यात घेतले. त्याने स्वतःचे नाव दुर्गेशकुमार असल्याचे सांगितले. त्याच्याजवळून ३० हजार रूपये किमतीचे पिस्तूल आणि एक हजार रूपये किमतीची चार जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. पोलिसांच्या मनाईचा आदेश भंग केला. तो या भागात कोणता तरी गंभीर गुन्हा करण्यासाठी आला होता. याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याच्यावर उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

पुण्यात ११ लाखांचा दंड वसुली; एकाच दिवसात हजारहून अधिक फुकट्या प्रवाशांना दणका

Next Post

राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

BreakingNews

भटक्या श्वानांच्या धुडगुसानंतर अखेर कल्याण महापालिकेला आली जाग; रोज ५० श्वानांचे निर्बिजीकरण करण्याचे आदेश

लोणावळा ग्रामीणमध्ये गांजाची तस्करी उघड; ८.५ किलो गांजासह तरुणाला अटक

लग्नसमारंभ, मिरवणुकांमध्ये पार्टी पॉपरवरील प्लास्टिक कन्फेटीवर बंदीची मागणी

“मराठी बोलताच आली पाहिजे!” १५ ऑगस्टनंतर रिक्षा-टॅक्सी चालकांची होणार परीक्षा – मंत्री सरनाईकांचा इशारा

ठाणे महापालिकेत ‘बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाचा शुभारंभ; विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्लास्टिकमुक्तीची जनजागृती

११ ऑगस्टपासून दुधाचे दर कडाडणार! दुधासह दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.