Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन, नैसर्गिक तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याप्रकरणी भाईंदरच्या गावकऱ्यांवर गुन्हा दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 1, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन, नैसर्गिक तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याप्रकरणी भाईंदरच्या गावकऱ्यांवर गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

भाईंदर : भाईंदरच्या राई येथील गावकऱ्यांनी महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून नैसर्गिक तलावात दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंदा गणेशोत्सवात सहा फूटाखालील गणेशमूर्तींचे विसर्जन सक्तीने कृत्रिम तलावात करण्याचा निर्णय मिरा-भाईंदर महानगरपालिकेने घेतला होता. त्यासाठी शहरातील विविध ठिकाणी तब्बल ३५ कृत्रिम तलाव उभारण्यात आले. त्यानुसार गुरुवारी दीड दिवसांच्या मूर्तींचे विसर्जन या तलावांमध्ये पार पडले. मात्र, भाईंदरमधील जुने राई, मोर्वा व मुर्धा गावातील नागरिकांनी कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास नकार दिला आहे.

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रशासनाच्या या निर्णयामुळे त्यांच्या जुन्या संस्कृती व परंपरेला धक्का बसणार आहे. तसेच पालिका स्वतःच सांडपाणी थेट समुद्रात सोडते आणि त्यामुळे मिठागर व शेतजमीन प्रदूषित होते. म्हणून यंदाही मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक तलावातच करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी सुरुवातीपासून व्यक्त केला होता. दरम्यान, गुरुवारी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन सुरू असताना राई गावात मोठा गोंधळ झाल्याचे दिसून आले. प्रशासनाने रोखण्याचा प्रयत्न करूनही गावकऱ्यांनी नैसर्गिक तलावातच मूर्तींचे विसर्जन केले.त्यामुळे महापालिका प्रशासनाने संबंधित गावकऱ्यांविरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून या प्रकरणी २५ ते ३० गावकऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२,१९०,१९१(२), १९२,१९५(१),३२४(३), २२३ आणि ११५ (२) सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४,३ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ कलम १५(१) प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिली आहे.

Previous Post

CSMTकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद; मुंबई पोलिसांचा निर्णय

Next Post

पुणेकरांची वाहतूक कोंडी मधून सुटका करण्यासाठी सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुल महत्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
पुणेकरांची वाहतूक कोंडी मधून सुटका करण्यासाठी सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुल महत्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणेकरांची वाहतूक कोंडी मधून सुटका करण्यासाठी सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुल महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.