Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आझाद मैदानात मराठा-ओबीसी बेमुदत आंदोलन, मराठा आंदोलकांची मोठी गर्दी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 29, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
आझाद मैदानात मराठा-ओबीसी बेमुदत आंदोलन, मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षण व अन्य मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आझाद मैदान परिसर आणि मुंबई महानगरपालिका मार्गावर मराठा आंदोलकांनी तुफान गर्दी केली आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला आहे. मनोज जरांगे पाटील आझाद मैदान परिसरात दाखल झाल्यानंतर मराठा आंदोलकांकडून जल्लोष करण्यात आला.

मराठा आंदोलक हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगवी टोपी आणि गळ्यात भगवे शेले घालून आझाद मैदान परिसरात जमले आहेत. विविध अटी आणि शर्तींसह मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. पोलिसांनी पाच हजार आंदोलकांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र पाच हजारांहून अधिक आंदोलक जमले असून आझाद मैदान खचाखच भरले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व आझाद मैदान परिसर, मुंबई महानगरपालिका मार्ग, क्रॉफर्ड मार्केट – भेंडी बाजार, वाडी बंदर परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलकांच्या गर्दीसह त्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगाही पाहायला मिळत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, तसेच ड्रोनच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवले जात आहे.

ठिकठिकाणी रस्ता रोधक उभारून गर्दीचे नियंत्रण करण्याचा मुंबई पोलीस प्रयत्न करीत आहेत. तसेच आझाद मैदानाकडे चालत जाण्याचे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे. आझाद मैदानातील पाच हजार आंदोलकांची मर्यादा संपली आहे. त्यामुळे पोलिसांकडून आंदोलकांना आझाद मैदानाबाहेरच थांबविले जात आहे, मात्र मराठा आंदोलक आझाद मैदानात जाण्यावर ठाम आहेत. याप्रसंगी काही आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात रस्ता अडविण्यासह बसगाड्या व इतर वाहने थांबविली आहेत. याप्रसंगी पोलिसांनी समजूत काढण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र मराठा आंदोलकांनी ‘रास्ता रोको’ सुरूच असल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

Previous Post

ठाण्यात विसर्जनसाठी ‘हरित विसर्जन’ अॅप, संकेतस्थळावर नोंदणी करून करता येणार सुलभ विसर्जन

Next Post

गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास भाईंदरमधील गावकऱ्यांचा विरोध

Next Post
गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास भाईंदरमधील गावकऱ्यांचा विरोध

गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास भाईंदरमधील गावकऱ्यांचा विरोध

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.