Lokrakshanay
Saturday, May 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

मुंबईत पहाटेपासून पावसाने धरला जोर; २-३ दिवस पाऊस सक्रिय, हवामान विभागाचा अंदाज

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 25, 2025
in Uncategorized, ताज्या बातम्या, मुंबई
मुंबईत पहाटेपासून पावसाने धरला जोर; २-३ दिवस पाऊस सक्रिय, हवामान विभागाचा अंदाज
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी पहाटेपासून अनेक भागात संततधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शहर आणि उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून संततधार पाऊस कोसळत आहे. शहरातील परळ, कुलाबा, वरळी भागात पावसाचा जोर वाढला आहे. उपनगरातील वांद्रे, अंधेरी परिसरात देखील पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढील दोन – तीन दिवस पाऊस सक्रिय राहील,  असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने शहर आणि उपनगरांत मागील दोन – तीन दिवसांपासून हजेरी लावली आहे.

पावसाळी वातावरण, ढगाळ हवामानामुळे मुंबईतील उकाडा काहीसा कमी झाला आहे. याचबरोबर पाऊसही संततधार कोसळत आहे. यामुळे जुलै महिन्याची सरासरी पाऊस गाठेल अशी आशा पल्लवित झाली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे पाऊस सरासरी गाठेल की नाही याबद्दल शंका होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे सरासरी गाठता येईल. हवामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत आज अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. याचबरोबर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, वर्धा, नागपूर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर पालघर, नाशिक घाट परिसर, सातारा, कोल्हापूर, अमरावती, हिंगोली, नांदेड, या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच वाशिम, अकोला, यवतमाळ, परभणी, बुलढाणा या भागात विजांसह पावसाची शक्यता आहे.

Previous Post

“आता तुम्ही सर्व मरणार..”, कुर्लामधील शाळेला बॉम्बस्फोटाची धमकी

Next Post

मुंबई-पुण्यात कॉल सेंटरवर सीबीआयचे छापे, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
मुंबई-पुण्यात कॉल सेंटरवर सीबीआयचे छापे, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई-पुण्यात कॉल सेंटरवर सीबीआयचे छापे, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

BreakingNews

‘देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार ‘मुळशी पॅटर्न २’

मुंबई महापालिकेची डिजिटल झेप; भारतातील पहिली एआय आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

मुंबईत CNG-PNG दरवाढीचा आणखी झटका; १५ दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

ईदनिमित्त ‘मैं हूँ…’ गाण्याची खास भेट; सलमान खानचा रोमँटिक अंदाज चर्चेत!

१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; नर्दुल्ला टँक मैदान वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.