Lokrakshanay
Tuesday, April 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

पुण्यात मद्य विक्रीच्या दुकानातून तब्बल ३ लाखांची रोकड लंपास

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 22, 2025
in गुन्हेगारी, पुणे
पुण्यात मद्य विक्रीच्या दुकानातून तब्बल ३ लाखांची रोकड लंपास
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : शहरातील मद्य विक्री करणाऱ्या दुकानांचा दरवाजा उचकटून रोकड, तसेच मद्याच्या बाटल्या लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी नगर रस्त्यावरील वाघोली भागात असलेल्या एका मद्य विक्रीचा दरवाजा उचकटून दोन लाख ७० हजारांची रोकड, तसेच मोबाइल संच लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत सागर निरंजनकुमार बत्रा (वय ३३, रा. लुंकड स्काय लाऊंज, कल्याणीनगर, येरवडा) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बत्रा यांचे नगर रस्त्यावरील केसनंद फाटा येथे सागर वाईन्स हे मद्य विक्रीचे दुकान आहे. रविवारी (२१ जुलै) मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचा लोखंडी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील दोन लाख ७० हजारांची रोकड आणि मोबाइल संच असा मुद्देमाल लांबवून चोरटे पसार झाले. सोमवारी सकाळी मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील रोकड लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करत आहेत. वारजे माळवाडी भागातील एका मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरांनी गल्ल्यातील ११ हजारांची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी (१९ जुलै) घडली. गेल्या पंधरा ते वीस दिवसांत कल्याणीनगर, येरवडा, कोंढवा भागातील मद्य विक्रीची दुकाने फोडून चोरट्यांनी मद्याच्या बाटल्या, तसेच रोकड लांबविल्याच्या घटना घडल्या. मद्यावरील कर वाढविल्यानंतर मद्याच्या दरात वाढ झाली आहे. मद्य दरवाढीनंतर शहरात मद्य विक्री दुकानातील रोकड, मद्याच्या बाटल्या लांबविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

Previous Post

सेवेचे समाधान आणि आशीर्वादाची संपत्ती!

Next Post

‘टेस्ला’ शो रुमचे नाव मराठी की हिन्दी? मराठी भाषिकांकडून संताप व्यक्त

Next Post
‘टेस्ला’ शो रुमचे नाव मराठी की हिन्दी? मराठी भाषिकांकडून संताप व्यक्त

‘टेस्ला’ शो रुमचे नाव मराठी की हिन्दी? मराठी भाषिकांकडून संताप व्यक्त

BreakingNews

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.