Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

चालत्या बस मधून फेकले नवजात बाळाला; बाळाचा मृत्यू, जोडप्याला अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 17, 2025
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
चालत्या बस मधून फेकले नवजात बाळाला; बाळाचा मृत्यू, जोडप्याला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील परभणीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. परभणीमध्ये चालत्या स्लीपर बसमध्ये एका १९ वर्षीय महिलेने मुलाला जन्म दिला, परंतु तिने आणि तिचा पती असल्याचा दावा करणाऱ्या एका पुरूषाने नवजात बाळाला खिडकीतून बाहेर फेकले, ज्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. बसमधून रस्त्यावर पडल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाला, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. ही घटना १५ जुलैला सकाळी ६.३० वाजता पाथरी-सेलू रस्त्यावर ही घटना घडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. एका नागरिकाने बसमधून कापडात गुंडाळलेले काहीतरी फेकल्याचे पाहिले, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

‘रितिका ढेरे नावाची एक तरुणी संत प्रयाग ट्रॅव्हल्सच्या स्लीपर कोच बसमध्ये अल्ताफ शेख (जो तिचा पती असल्याचा दावा करत होता) सोबत पुण्याहून परभणीला जात होती.’ तो म्हणाला, ‘प्रवासादरम्यान गर्भवती महिलेला प्रसूती वेदना झाल्या आणि तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र, त्या जोडप्याने नवजात बाळाला कापडात गुंडाळले आणि बसबाहेर फेकून दिले.’ स्लीपर बसच्या चालकाला खिडकीतून काहीतरी फेकलेले दिसले. त्याने त्याबद्दल विचारले तेव्हा शेखने त्याला सांगितले की त्याच्या पत्नीला मळमळ होत होती ज्यामुळे तिला उलट्या झाल्या. अधिकाऱ्याने सांगितले की, ‘दरम्यान, रस्त्यावर एका व्यक्तीने बसमधून फेकलेली वस्तू पाहिली तेव्हा तो जवळ गेला आणि बाळ पाहून तो थक्क झाला. त्याने ताबडतोब पोलिसांना कळवले.’ नंतर, गस्तीवर तैनात असलेल्या स्थानिक पोलिसांच्या पथकाने बस थांबवली. वाहनाची तपासणी आणि प्राथमिक चौकशी केल्यानंतर, त्यांनी महिलेला आणि शेखला ताब्यात घेतले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

या जोडप्याने सांगितले की, बाळाचा सांभाळ करणं शक्य नसल्यामुळे आम्ही त्याला फेकल्याचं सदर जोडप्याने सांगितले. त्यांनी सांगितले की रस्त्यावर फेकल्यानंतर बाळाचा मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ढेरे आणि शेख दोघेही परभणीचे रहिवासी आहेत आणि गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात राहत आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की ते पती-पत्नी असल्याचा दावा करत होते, परंतु हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. “त्यांना ताब्यात घेतल्यानंतर, पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले.

Previous Post

धुळे येथे उद्योग विस्तारासाठी ‘लॉजिस्टिक हब’ उभारणार!

Next Post

व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह स्टेटस; दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी केली मारहाण

Next Post
व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह स्टेटस; दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी केली मारहाण

व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह स्टेटस; दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी केली मारहाण

BreakingNews

पाकिस्तानात ‘धुरंधर’ रिटर्न्स? लाहोरमध्ये हमजावर भररस्त्यात गोळीबार

चहापूर्वी पाणी फायदेशीर, पण चहानंतर लगेच पाणी टाळा; आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.