Lokrakshanay
Thursday, August 13, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

“सांगली जिल्ह्यात सुरू झाला पहिला सौरऊर्जा प्रकल्प” – शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 20, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
“सांगली जिल्ह्यात सुरू झाला पहिला सौरऊर्जा प्रकल्प” – शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळणार
Share on FacebookShare on Whatsapp

सांगली : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पहिला ४ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प बसरगी (ता. जत) येथे सुरू झाला आहे. यामुळे बसरगी, सिंदूर आणि गुगवाड येथील १,१०० शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी वीजपुरवठा होईल.

कृषी वाहिन्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेवर आधारित मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ राबवली जात आहे. हा प्रकल्प सांगली जिल्ह्यातील पहिला असून, राज्यातील १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचा एक भाग आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ अंतर्गत जिल्ह्यात ३४ ठिकाणी एकूण २०७ मेगावॅट क्षमता असलेले सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांच्या पूर्णतेनंतर ७५ कृषी वाहिन्यांवर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे, तसेच कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारीही दूर होतील. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठीही मदत होईल.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ अंतर्गत जिल्ह्यात जमीन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आणि प्रशासनाच्या टीमचे महत्वाचे योगदान मिळाले आहे. भूमी अभिलेख कार्यालय आणि जिल्हा परिषद यांचे सहकार्यही महत्वाचे ठरले आहे. प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना पाच लाख रुपये एकरकमी अनुदान दिले जात आहे, अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांनी दिली.

सौरऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. यामुळे दिवसा वीज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. यामुळे येणाऱ्या काही वर्षांत विजेचे दर कमी होण्यासही मदत होईल. महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांनी ग्रामपंचायतींना या पर्यावरणपूरक विकासकामात सहभागी होण्याचे तसेच महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Previous Post

आश्वासने पूर्ण होणार;योजना बंद होणार नाहीत …महाराष्ट्र आता थांबणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Next Post
बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

BreakingNews

ठाण्यात स्वातंत्र्यदिनी रंगणार श्वानांची अनोखी देशभक्ती; ‘स्वातंत्र्य दिन पेट परेड’चे आयोजन!

गोष्टी आणि कलेच्या माध्यमातून घडणार विद्यार्थ्यांचे भविष्य; पालघर जिल्हा परिषदेचा ‘कहानी-कला-खुशी’ उपक्रम!

‘महाज्योती’ची यूपीएससीत दमदार कामगिरी; केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात ११ विद्यार्थी असिस्टंट कमांडेंट

वर्तकनगरमध्ये महापालिकेचा बुलडोझर; हातगाड्या, पानटपऱ्या हटवून पदपथ केले चकाचक!

पान मसाल्याच्या पॅकेजिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पान मसाल्यासाठी प्लास्टिक आणि ॲल्युमिनियम फॉइल पॅकेजिंग बंद!

‘वॉक फॉर वॉटर’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महा वॉकेथॉन’च्या लोगोचे प्रकाशन!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.