Lokrakshanay
Tuesday, April 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना मिळणार पैसे परत – नागपूर विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 19, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना मिळणार पैसे परत – नागपूर विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

नागपूर : उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पुनर्मूल्यांकन शुल्क परत करण्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने घेतला आहे. हा निर्णय १० जानेवारीपासून लागू होईल. हा निर्णय नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेत घेतला गेला. हिवाळी, २०२३ च्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झाले आहेत, त्यांनाच या निर्णयाचा फायदा होईल. या निर्णयाला परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाच्या मान्यतेनंतर अधिकृत घोषणा केली जाईल. या लाभासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांच्या बँक खात्यांची माहिती कॉलेजांकडून मागवली जाईल.

विद्यापीठाने प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक पेपरसाठी ४५० रुपये शुल्क आकारले जाते पुनर्मूल्यांकनासाठी. या मूल्यांकनानंतर विद्यार्थ्यांचे गुण वाढले किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले तरी त्यांना परत केलेले शुल्क प्राप्त होत नाही. विद्यार्थ्यांना शुल्क परत करण्याची मागणी माजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या कार्यकाळातच सुरू झाली होती. मंगळवारी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत सदस्य अॅड. मनमोहन बाजपेयी यांनी या मुद्द्यावर चर्चा केली आणि विद्यापीठ प्रशासन याबाबत निर्णय घेण्यास विलंब करत असल्याचे सांगितले. यावर चर्चा केल्यानंतर, परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. संजय कविश्वर यांनी १० जानेवारीपासून शुल्क परत करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाईल, असे सभागृहाला सांगितले.

पूर्वीच्या अधिसभेच्या बैठकीत देखील या विषयावर चर्चा करण्यात आली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे ऍड. मनमोहन बाजपेयी यांनी मंगळवारच्या अधिसभेत हा मुद्दा पुन्हा उचलला. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी या प्रक्रियेला त्वरित प्रारंभ करण्याच्या सूचना दिल्या. या प्रक्रियेत संलग्न कॉलेजांमधील पात्र विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांच्या बँक खात्यांची माहिती मागवली जाईल. या खात्यांमध्ये शुल्काची रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती विद्यापीठाने दिली आहे.

Previous Post

अश्लील, असभ्य सामग्री प्रकाशित केल्याबद्दल १८ ओटीटी प्लॅटफॉर्म सरकारने ब्लॉक केले

Next Post

कुलाबा ते बीकेसी मेट्रो ३ चा प्रवास मे २०२५ पासून प्रवासासाठी खुला होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
कुलाबा ते बीकेसी मेट्रो ३ चा प्रवास मे २०२५ पासून प्रवासासाठी खुला होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कुलाबा ते बीकेसी मेट्रो ३ चा प्रवास मे २०२५ पासून प्रवासासाठी खुला होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

BreakingNews

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.