Lokrakshanay
Monday, April 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

राज्य पातळीवर जबाबदारी माझ्यावर दिली तर ती मी स्वीकारणार – रोहित पवार

रोहित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद मिळणार का माहिती नाही, मात्र पंकजा मुंडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे, त्या लोकनेत्या आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 2, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
राज्य पातळीवर जबाबदारी माझ्यावर दिली तर ती मी स्वीकारणार – रोहित पवार
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : शरद पवार गटात भाकरी फिरवण्याची शंभर टक्के वेळ आली आहे. माझ्यावर राज्य पातळीवरील जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारणार, असा निर्धार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. ईव्हिएम संदर्भात काही लोकांनी अजून काही माहिती दिली आहे, असंही रोहित पवारांनी यावेळी सांगितलं. रोहित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद मिळणार का माहिती नाही, मात्र पंकजा मुंडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे, त्या लोकनेत्या आहेत. भाजपचा ८८ टक्के शिंदे गटाचा ७० टक्के अजितदादा ६९ टक्के स्ट्राईक रेट आहे. १० टक्के मतं भाजपला ईव्हिएमवर मिळत होती, ती सेट करण्यात आली होती. ईव्हिएममध्ये जर सेट केलं नसतं तर महाविकास आघाडीचे १२६ आमदार निवडून आले असते. उत्तम जानकर यांच्या गावात बॅलेट पेपरवर मतदान घेणार आहेत. मोहोळमध्ये काही लोकं लॅपटॉप घेऊन मतदान केंद्रावर फिरत होते असं सांगितलं जात आहे. ईव्हीएम मशीन आम्हाला द्यावीत आम्ही त्यावर चौकशी करू,असं आव्हानही रोहित पवारांनी दिलं. एकनाथ शिंदे यांना धोक्याची जाणीव झाली आहे, त्यामुळे ते गृहमंत्री पद मागत आहेत. ⁠अजित पवार यांच्या पक्षातील कोण मंत्री होणार हे त्यांनी ठरवले पाहिजे. मात्र भाजपच ते ठरवताना दिसते आहे. भाजपला फॅार असणाऱ्या शिंदे आणि अजित पवार गटातील आमदारांना मंत्रिपद मिळेल. ⁠पंकजा मुंडे यांना भाजप मुख्यमंत्री करु शकेल. त्यांचा अनुभव आहे. त्या ओबीसी नेत्या आहेत. त्यामुळे त्यांना देखील संधी मिळू शकेल, असंही रोहित पवार म्हणाले.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, पाथर्डीत आमचे उमेदवार निवडून येणार असं वाटतं होते. या ज्या शंका आहेत, त्या पालिका निवडणूका होण्याआधी दूर झाल्या पाहिजेत. कोर्टाच्या भरतीत कंत्राटी भरती करणार असं समजतंय त्याला आमचा विरोध असणार आहे. लाडकी बहीण योजनेत काही अटी शर्थी टाकल्या जाणार, २१०० रुपये दिले जाणार का? यावर शंका आहे. आम्ही अधिवेशनाची वाट बघत आहोत. कालच्या बैठकीत मीच रोहित पाटलांचे नाव सुचवलं आहे, मला विरोधी पक्षात जी जबाबदारी मिळेल ती स्वीकरणार आहे. हे सरकार सर्वांना लाभ देईल असं वाटत नाही. बऱ्याच महिला यामध्ये बाद होतील, काही योजना अशा आहेत निवडणुकींच्या आधी घोषणा केल्यात मात्र नंतर त्या बंद झाल्यात. आता लाडकी बहीण योजनेचे काय होतं ते बघूया.

Previous Post

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम व पल्स पोलिओ मोहिम प्रभावीपणे राबवा – जिल्हास्तरीय टास्क फोर्समध्ये आवाहन

Next Post

स्टीलमार्केट नंतर आता ईव्ही मार्केटमध्ये पदार्पण करणार – जेएसडब्ल्यू ग्रुप

Next Post
स्टीलमार्केट नंतर आता ईव्ही मार्केटमध्ये पदार्पण करणार – जेएसडब्ल्यू ग्रुप

स्टीलमार्केट नंतर आता ईव्ही मार्केटमध्ये पदार्पण करणार - जेएसडब्ल्यू ग्रुप

BreakingNews

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.