Lokrakshanay
Friday, July 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

केईएम रुग्णालयात स्वतंत्र वेदना व्यवस्थापन शस्त्रक्रियागृह कार्यान्वित

परिणामी, रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि भूल विभागाचे प्रमुख डॉ. अमला कुडाळकर यांच्या प्रयत्नाने वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभागासाठी स्वतंत्र शस्त्रक्रियागृह उपलब्ध करण्यात आले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 30, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
केईएम रुग्णालयात स्वतंत्र वेदना व्यवस्थापन शस्त्रक्रियागृह कार्यान्वित
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : गुडघा, खांदा आणि कंबरदुखीसारखे आजार व्यक्तीला नेहमीच हैराण करतात. मात्र आता योग्य व्यवस्थापन करून वेदनांमधून रुग्णांची सुटका करण्यासाठी केईएम रुग्णालयात स्वतंत्र वेदना व्यवस्थापन शस्त्रक्रियागृह सुरू करण्यात आले आहे. यामुळे वेदनांपासून आराम मिळविण्यासाठी प्रतीक्षायादीत असलेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. पाठदुखी, मानदुखी, खांदेदुखी, गुडघेदुखी, बोट ट्रिगर, नागीण, मायग्रेन, ट्रायजेमिनल, इंटरस्टिशियल सिस्टिटिस किंवा कर्करोग उपचारामध्ये रुग्णांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. विविध प्रकरणांमध्ये आजार बरा झालेला असतो, परंतु वेदना कायम असतात. अशा रुग्णांना वेदनांपासून मुक्ती देण्यासाठी केईएम रुग्णालयात २०११ मध्ये भूल विभागाच्या माध्यमातून वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला होता. हा विभाग भूल विभागाच्या प्रमुख डॉ. अमला कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. या विभागाला १४ वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्यांमध्ये ४५ ते ७० या वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक आहे. यात गुडघा दुखणे, पाठीचे आजार, खांदा दुखणे, पायाची नस खेचणे, पायाला मुंग्या येणे यांसारख्या आजाराने त्रस्त नागरिकांची संख्या अधिक आहे. यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे.

वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभागात दरआठवड्याला साधारणपणे २० ते २५ रुग्ण उपचारासाठी येतात. यापैकी १५ ते १६ रुग्णांना शस्त्रक्रियागृहामध्ये उपचार करण्याची आवश्यकता भासते. मात्र या विभागाचे स्वतंत्र शस्त्रक्रियागृह नसल्याने डॉक्टरांना अन्य विभागाच्या शस्त्रक्रियागृहाचा वापर करावा लागत होता. मात्र यासाठी त्यांना अन्य विभागाचे शस्त्रक्रियागृह रिक्त होण्याची वाट पाहावी लागत होती. त्यामुळे रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत होती. परिणामी, रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि भूल विभागाचे प्रमुख डॉ. अमला कुडाळकर यांच्या प्रयत्नाने वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभागासाठी स्वतंत्र शस्त्रक्रियागृह उपलब्ध करण्यात आले. अत्याधुनिक, संसर्गविरहित असलेल्या या शस्त्रक्रियागृहामध्ये फक्त वेदनांपासून मुक्त होण्यावर उपचार केले जाणार आहेत. तसेच या शस्त्रक्रियगृहामुळे रुग्णांची प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होणार आहे. या शस्त्रक्रियागृहाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आल्याची माहिती भूल तज्ज्ञ आणि पेन फिजिशियन्स डॉ. श्वेता साळगावकर यांनी दिली.

Previous Post

कल्याण-डोंबिवलीतील विनामीटर वीज वापरणाऱ्यांवर महावितरणाची कारवाई

Next Post

ठाकरे गटाच्या दिपेश म्हात्रे यांनी VVPAT मतमोजणीसाठी भरले लाखो रुपये

Next Post
ठाकरे गटाच्या दिपेश म्हात्रे यांनी VVPAT मतमोजणीसाठी भरले लाखो रुपये

ठाकरे गटाच्या दिपेश म्हात्रे यांनी VVPAT मतमोजणीसाठी भरले लाखो रुपये

BreakingNews

अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर

डिजिटल व्यवस्थेचा ज्येष्ठ नागरिकांना फटका; बोटांचे ठसे न जुळल्याने एसटीच्या सवलतीला मुकण्याची वेळ!

विनातिकीट फिरणाऱ्यांना १६ कोटींचा फटका! मध्य रेल्वेने ४० दिवसांत पकडले २ लाख प्रवासी

मलबार हिल निसर्ग उन्नत मार्ग ऑगस्टअखेरपर्यंत पर्यटकांसाठी बंद!

डॉ. निलेश साबळेची नव्या शोची चाहूल; ‘काहीतरी मॅड येतंय लवकरच’ पोस्टने चाहत्यांमध्ये उत्सुकता

पारशी डेअरीवर FDA ची मोठी पकड! दूध भेसळप्रकरणी परवाना निलंबित, दोघांना बेड्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.