Lokrakshanay
Thursday, September 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा येथील ढाब्यावर विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

मानपाडा पोलिसांच्या गस्ती पथकाने जय मल्हार चायनिज ढाब्यामध्ये रविवारी रात्री प्रवेश केला.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 25, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा येथील ढाब्यावर विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा येथील कासा रिओ भागात जय मल्हार चायनिज ढाबा येथे विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या ढाबा चालका विरुध्द मानपाडा पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. कल्याण परिमंडळातील पोलिसांनी उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून परिमंडळातील बेकायदा धंद्यांविरुध्द जोरदार मोहीम सुरू केली आहे. या कारवाईमुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

मानपाडा पोलीस ठाण्याच्या प्राथमिक तपासणी अहवालातील माहिती अशी, की साहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ, हवालदार विजय आव्हाड आणि गस्ती पथक रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान पलावा कासा रिओ भागात गस्त घालत होते. त्यांना जय मल्हार चायनिज ढाबा येथे ग्राहकांना मद्य पिण्यासाठी दिले जात असल्याचे दिसले. नऊ ग्राहक खुर्ची, मंचकावर मद्याचे पेले मद्य पित बसले होते.

मानपाडा पोलिसांच्या गस्ती पथकाने जय मल्हार चायनिज ढाब्यामध्ये रविवारी रात्री प्रवेश केला. तेथील ग्राहक सेवा देणारे चायनिज ढाब्याचे प्रमुख शशिकांत कुंभार यांच्याकडे चायनिज ढाब्यात मद्य विक्री करण्यासाठी लागणारा परवाना आहे का, अशी विचारणा केली. त्यावेळी असा परवाना नसल्याची माहिती कुंभार यांनी पोलिसांना दिली.

मद्य विक्री करण्याचा परवाना नसताना लोकांना बेकायदेशीरपणे मद्य पिण्यासाठी जागा उपलब्ध करून, तसेच विनापरवाना खाद्य पदार्थाची विक्री करताना आढळून आल्याने पोलिसांनी चायनिज ढाबा चालक शशिकांत कुंभार यांच्यावर महाराष्ट्र प्रतिबंधित कायद्याने गु्न्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अधिकच्या चौकशीसाठी कुंभार यांना पोलीस ठाण्यात आणले. कुंभार हे पडले गाव जवळील नौपाडा गावचे रहिवासी आहेत.

 

Previous Post

मालेगाव येथील नामको बँकेच्या शाखेतील संशयास्पद आर्थिक उलाढालीचा सखोल तपास होणार; मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन

Next Post

मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरता बंद !

Next Post
मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरता बंद !

मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरता बंद !

BreakingNews

दहीहंडीत अश्लील नृत्यावर कारवाईचा इशारा; गणेशोत्सवात लेझर लाईटला बंदी, नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

गणेशोत्सवात भेसळमुक्तीचा ‘मुंढे पॅटर्न’; मुंबईतील व्यापारी आणि केटरर्सचा एफडीएला पूर्ण पाठिंबा

प्रसाद लाडांनी पाजले पाणी, पण जरांगेंची भूमिका कायम; गॅझेटच्या अध्यादेशाशिवाय माघार नाही!

वरळी कोळीवाडा आणि किनाऱ्यावरून दोन दिवसांत उपसला ५० टन कचरा!

नेपाळमधील महापुरातून आलेल्या माशांचे सेवन पडू शकते जीवावर!

मुंबईतील दोन प्रसिद्ध हॉटेलांचे परवाने निलंबित; अस्वच्छता, झुरळांचा प्रादुर्भाव आणि मुदतविना अन्नसाठा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.